पीएम्इंडिया
[
105KB ]
महाराष्ट्रातील 35 नवनिर्वाचित आमदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडेही यावेळी उपस्थित होते. सहकारी संघीयवादाच्या दिशेने केंद्र सरकारच्या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यांना केंद्रीय अर्थसंकल्पातील एकूण साधनसंपत्तीपैकी 62 टक्के वितरित करण्यात आली असून 38 टक्के केंद्राच्या वापरासाठी ठेवण्यात आले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. 14 व्या वित्तआयोगाच्या शिफारशी आम्ही पूर्णपणे स्विकारल्या असून केंद्रीय करांमध्ये 42 टक्के वाटा राज्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
कोळसा लिलाव आणि खनिजांवरील रॉयल्टी यातूनही राज्यांना लाभ मिळणार असल्याचे ते म्हणाले. या अतिरिक्त निधी आणि साधनसंपत्तीचा वापर पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी प्राधान्याने झाला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
Had an enjoyable & extensive interaction with 35 1st time MLAs of Maharashtra Assembly, who came to see Parliament. pic.twitter.com/Ve1vLYplUo
— NarendraModi(@narendramodi) March 4, 2015