पीएम्इंडिया
महाराष्ट्रातल्या नागपूर, आंध्र प्रदेशमधल्या गुंटुरजवळच्या मंगलागिरी आणि पश्चिम बंगाल मधल्या कल्याणी इथल्या नव्या एम्स साठी संचालकांच्या तीन पदाच्या निर्मितीला, पूर्व सुधारित श्रेणी 80000 रुपये (अधिक एनपीए मर्यादा 85000) मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे.
1956 च्या एम्स कायद्यानुसार आणि त्यात 2012 मध्ये केलेल्या सुधारणेनुसार या संस्थेला मुख्य कार्यकारी अधिकारी असेल आणि त्यालाच संचालक म्हणून नेमण्यात येईल. संस्थेच्या पहिल्या संचालकाची नियुक्ती केंद्र सरकार करेल त्यानंतर संस्था या नियुक्त्या करेल. सचिव म्हणून आणि प्रशासकीय मंडळ म्हणून हा संचालक काम पाहील आणि एम्स चे प्रशासन आणि कार्य सुरळीत चालण्यासाठी मदत करेल.
योग्य प्रक्रिया अनुसरून ही पदे तातडीने भरण्यात येतील.
N. Sapre/N.Chitale/Darshana