Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

महिला लोकप्रतिनिधींच्या राष्ट्रीय परिषदेला पंतप्रधानांनी संबोधित केले

महिला लोकप्रतिनिधींच्या राष्ट्रीय परिषदेला पंतप्रधानांनी संबोधित केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला प्रणित विकासाच्या महत्वावर भर दिला आहे. संसदेच्या केंद्रीय सभागृहात महिला लोकप्रतिनिधींच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सत्रात ते आज बोलत होते.

महिला विकास, या पलिकडे जाऊन महिलांच्या पुढाकाराने विकास याकडे आपण वाटचाल करायला हवी असं पंतप्रधान म्हणाले.

लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे या संमेलनाच्या आयोजनाच्या नेतृत्वाबद्दल आणि दूरदृष्टीबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केले. या परिषदेच्या बरोबरीनेच, प्रतिनिधीमधली अनुभवांची अनौपचारिक देवाणघेवाणही, समृध्द करुन जाते असं त्यांनी सांगितले. एकाच वेळी अनेक कामे करण्याला आधुनिक युगात सर्वात महत्व आहे आणि महिलांमध्ये ही प्रवृत्ती निसर्गत:च असते.

महिला लोकप्रतिनिधींनी तंत्रज्ञानाचा वापर करत आपल्या मतदारसंघांशी मेळ ठेवावा असं सांगून यासंदर्भात त्यांनी आपले अनुभवही कथन केले. “MyGov” या मंचाद्वारे आणि नरेंद्र मोदी ॲपद्वारे प्राप्त होणारे दृष्टीकोन आणि समृध्द विचारांबाबतही त्यांनी यावेळी माहिती दिली.

N.Chitle / S. Tupe / M. Desai