Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यातली क्षणचित्रे पंतप्रधानांनी सामायिक केली


नवी दिल्‍ली, 12 ऑगस्‍ट 2026

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या ‘ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाईफ, माय स्ट्रगल्स’ (Triumph of the Indian Republic: My Life, My Struggles) या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यातील आपल्या भाषणाची क्षणचित्रे  सामायिक केली आहेत. या पुस्तकातील मुख्य संकल्पनेवर भर देत त्यांनी नमूद केले की, या पुस्तकात कोविंद जी यांचा प्रेरणादायी संघर्ष, विविध भूमिकांमधून त्यांनी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान आणि जनसेवेप्रती असलेली त्यांची दृढ निष्ठा उत्कृष्टपणे अधोरेखित केली असून प्रत्येक भारतीयासाठी ते प्रेरणास्थान असून यातून देशाच्या लोकशाहीची खरी ताकद प्रतिबिंबित होते.

‘एक्स’ वरील पोस्टच्या  मालिकेत पंतप्रधान म्हणाले :

“माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी यांच्या ‘ ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक: माय लाईफ, माय स्ट्रगल्स’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याचा भाग बनताना मला आनंद झाला. हे पुस्तक भारतीय लोकशाहीची खरी ताकद आणि त्यातील शक्यतांचे प्रतिबिंब दर्शवते.”

 

“माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंदजी यांचे पुस्तक वाचनीय असून प्रेरणादायी आहे, त्यात त्यांनी केलेला संघर्ष, सेवा आणि खासदार, राज्यपाल आणि देशाचे  राष्ट्रपती म्हणून दिलेले  मोलाचे योगदान उत्कृष्टपणे अधोरेखित केले आहे.”

 

“रामनाथ कोविंद जी यांनी आपल्या आयुष्यासाठी जनसेवेचा मार्ग निवडला आणि ते सदैव आपल्या कर्तव्याप्रती पूर्णपणे समर्पित राहिले. त्यांची निष्ठा आणि सेवाभाव प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे.”

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai