Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मातृत्व लाभ विधेयक लोकसभेत मंजूरीबाबत पंतप्रधानांतर्फे प्रशंसा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मातृत्व लाभ विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याबद्दल स्तुती केली आहे. महिला प्रणित विकासाच्या दिशेने सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये हा मैलाचा दगड असल्याचे ते म्हणाले.

“मातृत्व लाभ विधेयक लोकसभेत मंजूर होणे हे महिला प्रणित विकासाच्या दिशेने सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये मैलाचा दगड आहे.

मातृत्व लाभ सुधारित विधेयकामुळे आई आणि मुलाच्या अधिक चांगल्या आरोग्याची आणि कल्याणाची खात्री मिळेल. प्रसूती रजेत वाढ ही स्वागतार्ह तरतूद आहे.

महिलांचा रोजगार, सुरक्षित होणार असल्यामुळे मातृत्व लाभ सुधारित विधेयकाचे आभार. कार्यालयांमध्ये पाळणा घरे बंधनकारक करण्याची तरतूद कौतुकास्पद आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/S.Kulkarni/Anagha