पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मारुफ रझा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली आहे.
मारुफ रझा यांनी पत्रकारिता जगताला उल्लेखनीय योगदान देऊन समृद्ध केले, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांना संरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींविषयी उत्तम जाण होती आणि त्यातून सार्वजनिक चर्चा त्यांनी समृद्ध केली, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
रझा यांच्या निधनामुळे दुःख झाल्याचे आणि त्यांचे कुटुंबीय व स्नेही यांच्या दुःखात सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्सवर म्हटले आहे:
”श्री मारुफ रझा यांनी पत्रकारिता जगताला उल्लेखनीय योगदान देऊन समृद्ध केले. त्यांना संरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक बाबींविषयी उत्तम जाण होती आणि त्यातून सार्वजनिक चर्चा त्यांनी समृद्ध केली. त्यांच्या निधनामुळे दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय व स्नेही यांच्या दुःखात सहभागी आहे.”
Shri Maroof Raza Ji made a rich contribution to the world of journalism. He enriched public discourse with his nuanced understanding of defence, national security as well as strategic affairs. Pained by his passing. Condolences to his family and friends.
— Narendra Modi (@narendramodi) February 26, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com