Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माहिती आणि संवाद तंत्रज्ञान क्षेत्रासंदर्भात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामंजस्य करार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि आफ्रिका यांच्यात माहिती आणि संवाद तंत्रज्ञान क्षेत्रात परस्पर सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी 8 जुलै 2016 रोजी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराबाबत माहिती दिली.

माहिती आणि संवाद तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही पक्षांमध्ये सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आंतर-संस्थात्मक संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा सामंजस्य करार सहाय्यक ठरेल.

या करारामुळे माहिती आणि संवाद तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमधील खासगी संस्था, क्षमता उभारणी संस्था तसेच शासकीय आणि इतर सार्वजनिक संघटना यांच्यात सहकार्य आणि देवाण-घेवाण वाढीला लागेल.

B.Gokhale/M.Pange/Anagha