पीएम्इंडिया
व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि विशाल संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या बंधूभगिनिनो,
तुम्ही कल्पना करू शकता की मी आज किती आनंदाचा अनुभव घेतो आहे. भारतीय जनता पार्टीने जेव्हा २०१४ सालच्या निवडणुकीत मला प्रचाराची जबाबदारी दिली तेव्हा मी पहिल्यांदा रायगड किल्ल्यावर आलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर बसून मी विचार केला की या पराक्रमी महापुरुषाने, हिंदुस्थानच्या इतिहासात सुशासन आणि प्रशासनाचा एक नवा अध्याय लिहिला आणि आपल्या योग्यतेच्या आणि क्षमतेच्या आधारावर त्यांनी हा इतिहास रचला होता. चहुबाजूनी संकटानी घेरलेले असताना, संघर्षमय जीवन जगताना त्यांनी हा इतिहास निर्माण केला कदाचित इतिहासात असे दुसरे व्यक्तिमत्व सापडणार नाही ज्याने सततच्या संघर्षमय जीवनातही सुशासानाच्या उज्ज्वल परंपरेला कायम ठेवलं , नव्हे अधिकच मजबूत बनवले. ही परंपरा पुढे नेली.
इतिहासकारांच्या, शिवाचरित्रकारांच्या, रंगकर्मीच्या नजरेतून जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र बघतो, तेव्हा ते घोड्यावर स्वार आणि हातात तलवार असे असते, ते पाहून आपल्या मनात शिवरायांची केवळ एकच प्रतिमा तयार झाली आहे. मात्र शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. जर आपण भगवान रामचंद्राचे मूल्यांकन फक्त रावण वधाने केले, श्रीकृष्णाचे मूल्यांकन केवळ कंसवधाने केले किंवा महात्मा गांधींचे मूल्यांकन फक्त इंग्रजाना भारतातून पळवून लावले, याच घटनेने केले तर, आपण या महापुरुषांचे संपूर्ण व्यक्तिमत्व जाणून घेण्यात अपयशी ठरू, हे आपल्याला मान्य करावे लागेल. प्रभू रामचंद्रानी केलेला रावणाचा वध ही घटना त्यांच्या आयुष्यातल्या अनेक पैलूपैकी एक पैलू होता, मात्र त्यांच्या आयुष्यात असे इतर अनेक पैलू होते जे आजही भारतीय समाजमनाला प्रभावित करतात. श्रीकृष्णाच्या आयुष्यात कंस ही केववध ही केवळ एक घटना होती. युध्दाच्या मैदानावर कृष्णाने जो गीतेचा संदेश जगाला दिला, त्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही, की ही भूमी अशा व्यक्तीना जन्म देते, जे युध्दाच्या मैदानावरही शतकानुशतके प्रेरणादायी ठरेल असे चिंतन जगाला देऊ शकतात. माहात्मा गांधी स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढले, मात्र त्यासोबत गांधीजीनी समाजातल्या दुष्प्रवृत्तीविरोधाताही लढा दिला, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चेतना भरण्याचा प्रयत्न केला, आत्मविश्वास जागवण्याचा प्रयत्न केला. या कार्याला आपण कधीच कमी लेखू शकत नाही. तशाच प्रकारे शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व केवळ घोडा, तलवार, युध्द, लढाई यापुरते मर्यादित नाही. ते एक पराक्रमी वीर होते. पुरुषार्थाने संपन्न होते, आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्त्रोत होते. मात्र आपण कल्पना करा, शिवाजी महाराजांनी प्रत्येक व्यक्तीच्या मनात चेतना जागवण्याचा प्रयत्न केला, आत्मसन्मान जागवण्याचा प्रयत्न केला, त्याला आपण कमी लेखू शकत नाही. त्यामुळेच शिवाजी महाराजांचे चरित्र केवळ तलवार, घोडा, युध्द, लढाई इतपर्यंत मर्यादित राहत नाही.ते पराक्रमी वीरपुरुष होते, आपल्या सगळयांचे प्रेरणास्त्रोत होते. जशी प्रभू रामचंद्रानी लहान लहान वानरांची सेना बनवली, वानरसेना बनवली. त्यांच्या भरवशावर युध्द जिंकले.त्यामागे किती मोठे संघटन कौशल्य होते ! छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील छोट्या छोट्या मावळ्यांना एकत्र केले आणि युद्धासाठी तयार केले. यातूनच त्यांनी खूप मोठ्या संघटन कौशल्याचा प्रत्यय आपल्याला दिला.
आजही भारतातील अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना जर जलव्यवस्थापनाचे धडे विचारले, पाण्यासाठीच्या मूलभूत सुविधा काय असतात, हे विचारले, पाण्यासाठी वणवण करणाऱ्या लोकांपर्यंत पाणी कसे पोहोचवावे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला हवी असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलव्यवस्थापनाचा अभ्यास करावा लागेल. शिवाजी महाराजांनी त्याकाळात पाण्याची जी व्यवस्था तयार केली होती ती आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे मुद्राधोरणही अभ्यासनीय आहे. स्वराज्याची नाणी बनवण्याचे काम करायला परदेशी लोक तयार होते. मात्र शिवरायांकडे दूरदृष्टी होती. त्यांनी विचार केला की जर चलनावर इतर कोणाचा अधिकार निर्माण झाला तर राज्याला पराजित करण्यास त्याना काही वेळ लागणार नाही. त्यामुळेच त्यांनी स्वतःच मुद्रा बनवण्याची व्यवस्था केली. कधीही विदेशात चलन बनवण्याची व्यवस्था स्वीकारली नाही.
आज सगळ्या जगात सागरी सुरक्षा हा एक महत्वाचा विषय बनला आहे. सगळे देश सागरी सुरक्षेबाबत सजग झाले आहेत. प्रत्येकाला आपल्या सामुद्रिक अधिकारांची चिंता आणि व्यापारी संबंधांना सुरक्षाकवच मिळवण्याची धडपड असते. मात्र इतक्या वर्षांपूर्वी एक असा वीर पुरुष तयार जन्माला आला होता, ज्यांनी प्राचीन काळात नौदलाची स्थापना केली होती. सागरी सामर्थ्य ओळखले होते. आपण जेव्हा सिंधुदुर्ग आणि इतर गडकिल्ले बघतो, तेव्हा आपल्याला जाणवते की त्यांनी नौदलाच्या आवश्यकतेवर भर दिला होता. ही खरी गोष्ट आहे की जगभरात जिथे जिथे पुरातन व्यवस्था आहेत,तिथे तिथे पर्यटनाला आकर्षित करण्यासाठी आयकॉनिक गोष्टी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. आजही जगात जेव्हा भारतातल्या पर्यटनावर चर्चा होते, तेव्हा ताजमहालाचा विषय निघाला तर लोकांना वाटते की आपण ते बघायला हवे. प्रत्येक युगात अशा संस्मरणीय वास्तूंची निर्मिती झाली आहे, जी शतकानुशतके देशाची ओळख बनल्या आहेत. मात्र जगात असेही अनेक देश आहेत, जिथे फक्त किल्ल्यांच्या पर्यटनासाठी विशेष व्यवस्था आहे. भारतातही अनेक राजा महाराजांच्या काळात बांधले गेलेले असे अनेक किल्ले कानाकोपर्यात आहेत. या किल्ल्ल्यांची स्वतःची रचनेची वैशिष्ट्ये आहेत, सुरक्षेसाठीचे विज्ञान आहे, स्थापत्यशास्त्र आहे. त्यावेळी कशा प्रकारच्या वस्तूंचा वापर होता असे, त्याचीही अनेक वैशिष्टये आहेत. मात्र दुर्दैवाने आपण ताजमहालाच्या बाहेर कधी निघालोच नाही. या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात जगाला आकर्षित करण्यासाठी अनेक पर्यटन स्थळे आहेत. भारताच्या या सौंदर्याला जर जगासमोर नीट मांडले गेले, तर अख्या जगाला पर्यटनासाठी आकर्षित करण्याची शक्ती भारतात नक्कीच आहे. आज जगात सर्वात वेगाने विकसित होणारे क्षेत्र कुठले असेल तर ते पर्यटन आहे. जगातल्या प्राचीन परंपरा अस्तित्वात असलेला आणि त्या सांभाळणाऱ्या देशात पर्यटनाला आकर्षित करण्याचे सामर्थ्य आहे. पर्यटनात कोट्यावधींचा व्यापार होत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची जर आपण नीट निगा राखली आणि जगासामोर त्याना पर्यटनासाठी खुले केले, तर आपण जगाला हे किल्लेवैभव दाखवू शकू.
देशातल्या विद्यापीठांना जर आपण सांगितले की आम्हाला किल्ल्यांवर साहसी पर्यटन करायचे आहे, तुमच्या विद्यार्थ्यांना किल्ले चढायला सांगा, त्याना घोड्यावरून जायचे असेल तर आपण तशीही व्यवस्था करू शकतो. मी भारतीय पुरातत्व खात्यालाही विनंती करू शकतो ,की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपासून सुरुवात करुया, आणि देशभरात किल्ल्यांच्या पर्यटनासाठीचे वातावरण बनवूया. सर्वसामान्य लोक आकर्षित होतील असे, अशी त्या किल्ल्यांची निगा राखायला हवी. बंधू भगिनीनो माझ्यासाठी आज अतिशय आनंदाचा क्षण आहे, आणि त्यासाठी मी महाराष्ट्र सरकार आणि जनतेचा आभारी आहे. राज्यात जे शिवस्मारक बनणार आहे, त्याचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्याचे सौभाग्य मला मिळाले. अशी संधी जेव्हा मिळते तेव्हा ती आयुष्य धन्य झाल्याची अनुभूती देते. मला विश्वास आहे, की शिवस्मारकाची जी संकल्पना महाराष्ट्र सरकारच्या फडणवीस सरकारने साकारली आहे, ती नक्कीच प्रत्यक्षात येईल. जेव्हा हे शिवस्मारक बांधून पूर्ण होईल, तेव्हा संपूर्ण देशाला त्याचा अभिमान वाटेल, देशातली जनता त्या स्मारकाचा अभिमान बाळगेल आणि जगासमोर ताठ मानेने उभे राहून भारतीय लोक सांगतील की जगातले सर्वात मोठी आयकोनिक इमारत आमच्या देशात आहे. आणि ते ही अशा महापुरुषाचे स्मारक आहे, ज्याने सर्वसामान्यांच्या सुखासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले. अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्याची संधी आज मला मिळाली.
बंधू भगिनीनो, आपल्या देशात विविध प्रकारचे राजकारण झाले आहे. विविधातानी संपन्न असलेल्या या देशात अनेक प्रकारचे मार्ग अनुसरले गेले आहेत. मात्र आता ७० वर्षानंतर आपण ही गोष्ट स्वीकारायला हवी, की जर स्वातंत्र्यानंतर आपण जर केवळ विकासाचा पंथ स्वीकारला असता, तर भारतात आज ज्या समस्यांचा आपण सामना करतो आहोत, ज्या प्रश्नाची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत, ती तशी रुजली नसती. या समस्या उग्र झाल्या नसत्या. विकास हाच देशातल्या सर्व समस्यांचे समाधान आहे. देशातील युवकांना रोजगार देण्याची शक्यता विकासातच आहे. देशातल्या गरीबांना त्यांचा हक्क देण्याची ताकदही विकासातच आहे. मध्यमवर्गीय जनतेची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मोठी झेप घेऊन पुढे जायचे आहे, विकास त्याना ती संधी देईल. सन्मानाने जगण्याचा एकमेव मार्गही विकासाच आहे. आणि म्हणूनच बंधू भगिनीनो, जेव्हापासून तुम्ही आम्हाला ही जबाबदारी दिली, तेव्हापासून आम्ही विकास हा एकमेव केंद्रबिंदू ठेवला आहे. आणि हा विकास शाश्वत असावा, हे आमचे ध्येय असून त्यासाठी प्रयत्न सुरु आहे. विकास असा असायला हवा की ज्यातून गरीबाना आपल्या आयुष्यात बदल करण्याची संधी मिळायला हवी. त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची शक्ती मिळायला हवी, सक्षम करण्याची ताकद या विकासात हवी. आणि म्हणूनच, आमच्या सर्व योजनांचा केंद्रबिंदू गरीबांचे कल्याण हाच असायला हवा. सरकारी कामांसाठी ज्याना निवृत्तीवेतन मिळत होते, त्यांची माहिती मला मिळाली तेव्हा मी थक्क झालो. काही लोकांना ७ रुपये निवृत्तीवेतन मिळत होते , तर काही लोकांना ५१ रुपये. काही लोकांना ८० रुपये पेन्शन मिळत होती. अगदी १०० दीडशे रुपयांच्या आसपासही कोणी नव्हते. आता ज्याना ७ रुपये पेन्शन मिळते अशी ८० वर्षांची वृध्द व्यक्ती रिक्षा करून टपाल कार्यालयात कशाला जाईल ? त्यामुळेच आम्ही आल्याबरोबर निर्णय घेतला, सध्या ज्या अशा व्यक्ती आहेत, ज्याना कमी पेन्शन मिळते, त्यांना किमान एक हजार रुपये तरी मिळायला हवेत. यामुळे सरकारी तिजोरीवर ताण तर पडेल, कारण अशा लोकांची संख्या ३५ लाखाहून अधिक आहे. हा सगळ्यांच्या पेन्शन मध्ये वाढ करण्याने सरकारवर ताण तर येणार होताच, मात्र तरीही, आम्ही हा निर्णय घेतला, कारण त्यातून या वयोवृद्धांना एक चांगले आयुष्य जगण्याची संधी मिळणार होती, ती संधी त्याना मिळावी म्हणून आम्ही हा महत्वाचा निर्णय घेतला. आता औषधे महाग झाली आहेत. त्यावर उपाय म्हणून देशभरात जेनेरिक औषधे मिळावीत यावर आम्ही भर दिला आहे. देशभरात जन औषधालये बनवण्याचा विडा उचलला, कारण त्यातून गरीबाना माफक दरात औषधे मिळणार होती. त्याना योग्य औषधे स्वस्त दरात आणि वेळेत मिळावीत असा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून एकाही गरीबाचे औषधाच्या नावाखाली शोषण होऊ शकणार नाही. एखादी गरीब माता चुलीवर सैपाक करून आपल्या कुटुंबाचे पोट भरत असे.मात्र हे करताना त्या मातेच्या शरीरात एका दिवसात चारशे सिगारेट इतका धूर जात असे. अशी आई आजारी पडणार नाही तर काय ? तिची मुले आजारी पडणार नाही का? सरकारने निर्णय घेतला की दारिद्रय रेषेखाली असलेल्या, झोपड्यांमध्ये राहणाऱ्या या लोकाना चुलीच्या धुरापासून मुक्त करायचे. आणि देशातल्या कोट्यावधी कुटुंबाना गॅस सिलेंडर पुरवण्याचा विडाच आम्ही उचलला आहे. आतापर्यंत अनेक लोकाना हे सिलेंडर मिळाले आहेत. येत्या तीन वर्षात दारिद्रयरेषेखालच्या पाच कोटी कुटुंबाना गॅस सिलेंडर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, हे काम आम्ही सुरुही केले आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झालीत. मात्र आजून देशातली १८ हजार गावे अशी होती, जी आजही अठराव्या शतकात राहत होती. तिथे अद्याप विजेचा खांबही पोचला नव्हता, ताराही लागल्या नव्हत्या आणि वीजही नव्हती. ७० वर्षात जे या गावात वीजही पोहोचवू शकले नाहीत अशाना जनता माफ करेल का ? या सत्ताधाऱ्यांनी स्वतंत्र भारतातील १८ हजार गावातल्या जनतेला ७० वर्षे अंधारात राहण्यास भाग पाडले. त्यांनी कधी विजेचा उजेड पाहिलाच नव्हता, कायम अंधारातच दिवस काढले. अशा १८ हजार गावांमध्ये वीज पोहोचवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. अर्ध्यापेक्षा जास्त गावात आम्ही हे काम पूर्णही केले आहे. उरलेल्या गावात अतिशय वेगाने काम सुरु आहे. एक हजार दिवसात आम्हाला हे काम पूर्ण करायचेच आहे.
बंधू भगिनीनो, कोण म्हणते की देश बदलू शकत नाही? मी विश्वासाने सांगू शकतो , सवाशे कोटी भारतीयांच्या भरवशावर सांगू शकतो की देश बदलू शकतो, आणि माझे शब्द लिहून ठेवा की देश बदलेलही आणि पुढेही जाईल. आपला देश जगापुढे ताठ मानेने उभा राहिल. तीन वर्षांच्या माझ्या अनुभवांच्या आधारावर मी आज हे बोलतो आहे. तुम्ही कल्पना करू शकता, आज याच व्यासपीठावर ज्या प्रकल्पांचा शुभारंभ झाला त्यावरून विकासाच्या गतीची तुम्हाला कल्पना येईल. यास आगळ्या प्रकल्पांचा एकत्रित निधी लक्षात घेतला, तर तो आहे एक लाख सहा हजार कोटी रुपये! या व्यासपीठावर आज मी जितक्या प्रकल्पांच्या बटन दाबून त्यांचा शुभारंभ केला , त्या सगळ्यांची किंमत आहे, १ लाख ६ हजार कोटी रुपये. एकट्या मुंबईतच, एकाच कार्यक्रमात आपण एक लाख ६ हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ होणे, ही कदाचित इतिहासातली खूप मोठी घटना असेल. आणि आपण त्याची सुरुवात केली आहे.
बंधू भगिनीनो, मी आज इथे मुंबईच्या भूमीत आलो आहे, तर आज याप्रसंगी मला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेसमोर नतमस्तक होऊन त्यांचे अभिनंदन करायचे आहे, आभार मानायचे आहेत. आपल्या देशात आपण काही चांगले करा किंवा वाईट करा, लोकाना एक सवय जडली आहे. की तुम्ही काही चांगले करत असाल, तर त्याचा पुरावा काय?जर तुम्ही निवडणुका जिंकलात तर लोक मानतात की तुम्ही काहीतरी चांगले केले. जर तुम्ही हरलात तर समजले जाते की तुमचा निर्णय चुकीचा होता. जेव्हापासून आमचे सरकार सत्तेत आले तेव्हापासून आम्ही भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात लढाई सुरु केली. त्यादृष्टीने एकापाठोपाठ एक पावले उचललीत. मात्र आठ नोव्हेंबरच्या रात्री आम्ही या दोन्ही विरोधात मोठा हल्ला केला.बनावट नोटा, भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात लढा करण्याचा बिगुल आम्ही वाजवला. आणि माझ्या बंधू भगिनीनो, सव्वाशे कोटी भारतीय जनतेने या काळात अतिशय कष्ट झेलेले , त्रास सहन केला मात्र एका क्षणासाठीही माझी साथ सोडली नाही. त्यांचा बुद्धीभेद करण्याचे अनेक प्रयत्न झालेत. जनतेला घाबरवण्यासाठी अफवा पसरवल्या गेल्या. मात्र आपण ज्याना अशिक्षित, खेडवळ समजतो अशा लोकांनी त्यांच्या, कॉमन सेन्सचा वापर केला आणि कुठल्याही थापांना, अफवांना बळी पडणे टाळले, कोणाच्याही सांगण्याला ते भुलले नाहीत. देशाच्या भल्यासाठी असलेल्या या निर्णयाच्या बाजूने ते ठामपणे उभे राहिले. आणि आताच महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यातल्या जनतेने या निर्णयावर मोहोर लावली. त्यामुळे पूर्ण देशात हा संदेश गेला की जनता कोणासोबत आहे. देशाला कोणत्या दिशेने जायचे आहे?
बंधू भगिनीनो, मी गोव्यातच सांगितले होते की हा लढा सोपा नाही, ७० -७० वर्षे ज्यानी ही मलई खाल्ली आहे, असे तगडे मासे हा निर्णय यशस्वी न होण्यासाठी काहीही करतील, वाटेल त्या कल्पना लढवतील. आपली पूर्ण शक्ती त्यासाठी खर्च करतील. आणि खरच, कोणीही आपली शक्ती लावण्यात कुठलीच कसूर केली नाही. ज्याला जे जमले ते सगळे करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला. मात्र सव्वाशे कोटी भारतीयांच्या दृढ संकल्पासमोर ७० वर्षांपासून मलई खाणारे हे लोक कधीच टिकू शकत नाहीत आणि आपला देश कधीही हरू शकत नाही माझ्या मित्रांनो ! अशा मूठभर लोकांसमोर देश कधीही झुकणार नाही. काही लोकाना वाटत होते , की बँकेतल्या लोकाना पटवले, तर काळा पैसा पांढरा करता येईल. अरे, काळ्या- पांढऱ्याचा खेळ खेळणाऱ्या या लोकांनी स्वतःसोबतच बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही अडचणीत आणले. आता लक्षात येतंय की कसे कसे लोक या जाळ्यात अडकत आहेत. एकापाठोपाठ एक पडदा उघडला जातोय. त्याना वाटतेय की बँकेत पैसे जमा झाले , आता आपले काम झाले. अरे, बँकेत आल्यावरच तर खरे काम सुरु झाले आहे. माझ्या देशाबंधावाना मी सांगू इच्छितो, मी आधी सांगितले होते , पन्नास दिवस त्रास होईल, आणि माझ्या देशाबंधावानी हा त्रास सहन केला, आता जेवढे दिवसा उरले आहेत, तेवढे दिवसही ते त्रास सहन करतील, असा मला विश्वास आहे. मात्र बंधू भगिनीनो, पन्नास दिवसानंतर प्रामाणिक लोकांचा त्रास कमी होणार आहे, तर बेईमान लोकांचा त्रास वाढणार आहे. आताही मी जे बेईमान लोक आहेत, त्याना सांगतो आहे , आवाहन करतो आहे, त्यांनी भानावर यावे आणि देशाचा कायदा स्वीकारावा, त्याचे पालन करावे, आणि इतर सर्व नागरिकांप्रमाणे सुखी शांत आयुष्य जागा. मी तुम्हाला निमंत्रण देतो आहे. हे सरकार तुमचे काही वाईट करण्यासाठी कारवाई करत नाहीये. सरकार तुम्हाला फाशी देणार नाही. मात्र गरीबांचा जो हक्क आहे, तो त्याना मिळायलाच हवा, तो हक्क तुम्हाला त्याना द्यावाच लागेल. असे नं करणाऱ्याळा कुठलीही माफी नाही. जर कोणाला वाटत असेल, की आधीप्रमाणेच काहीतरी मार्ग काढून बाहेर निघता येईल, तर तो त्याचा गैरसमज आहे. तुम्हाला माहित असायला हवे की देशाचे सरकार बदलले आहे. तुम्हाला माहित असायला हवे की ३० वर्षानंतर भारताच्या जनतेने पूर्ण बहुमताचे सरकार बनवले आहे.भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला संपवणारे सरकार निवडून दिले आहे. आणि हे सरकार ते काम करणारच !
आणि म्हणूनच माझ्या बंधू भगिनीनो, आता येणारा काळ बेईमान लोकांच्या विनाशाचा काळ असेल. देशाच्या भल्यासाठी स्वच्छता अभियानाचा काळ असेल. देशाचे कल्याण व्हायचे असेल, तर सार्वजनिक जीवनात शुचिता असायला हवी. प्रशासन स्वच्छ असावे, देशात विश्वासाचे वातावरण असायला हवे, घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे महत्व असायला हवे. त्याचा सन्मान ठेवायला हवा. बंधू भगिनीनो, बेईमानीचे पाप करण्याची सवय मूठभर लोकाना आहे , मात्र त्याची शिक्षा देशातल्या कोट्यावधी लोकांना भोगावी लागते. अशा बेईमान लोकांना मोदींची भीती वाटत नसेल तर हरकत नाही, सरकारचीही भीती नसेल तरीही हरकत नाही. मात्र या बेईमान लोकांना सव्वाशे कोटी देशावासियांना तर घाबरावेच लागेल. त्यांच्या सध्याच्या विचारांना कमी लेखू नका. देशातल्या जनतेचा स्वभाव, विचार बदलले आहेत. आता ते अन्याय सहन करायला तयार नाहीत, बेईमानी, भ्रष्टाचार सहन करायला तयार नाही.काळ्या पैशाविरोधात लढा लढण्यासाठी ते सेनापती बनून सज्ज झाले आहेत. आणि म्हणूनच बंधू भगिनीनो, हा लढा जिंकण्यासाठी तुम्ही जे सहकार्य मला केले आहे त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि आज ह्या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या भूमीत जिथे आज शिवस्मारकाचा शुभारंभ झाला त्या मंगलक्षणी मी सर्व देशवासियांना वाचन देतो की ही लढाई तोपर्यंत थांबणार नाही, जोपर्यंत आपण ती जिंकत नाही.
मी पुन्हा एकदा या कामांसाठी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करतो. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माह्राराष्ट्राला एक विकासाला समर्पित असं सरकार मिळाले आहे. मग ते शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणारे जलयुक्त शिवार असो किंवा मग शहरात पायाभूत सुविधा निर्माण करायच्या असो, युवकांसाठी कौशल्य विकास किंवा मग शिक्षणाचे क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रात नवी उंची गाठण्यासाठी महाराष्ट्र पूर्ण ताकदीनिशी वाटचाल करतो आहे. मी त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे खूप खूप अभिनंदन करतो.
माझ्या सोबत तुम्ही सगळे म्हणा , छत्रपती शिवाजी महाराज की जय ! छत्रपती शिवाजी महाराज की जय ! छत्रपती शिवाजी महाराज की जय!
खूप खूप धन्यवाद !!
I am extremely delighted to be here, in this programme, with you all: PM @narendramodi in Mumbai
— PMO India (@PMOIndia) December 24, 2016
I still recall my visit to Raigad, after I was declared the Prime Ministerial candidate by my party: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 24, 2016
Even in the midst of struggle, Shivaji Maharaj remained a torchbearer of good governance: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 24, 2016
Shivaji Maharaj was a multifaceted personality. So many aspects of his personality inspire us: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 24, 2016
Yes, Mahatma Gandhi fought the British but at the same time he fought for equality in our society: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 24, 2016
His courage was known but there are so many more aspects of Shivaji Maharaj we must know about. Look at his policies on water, finance: PM
— PMO India (@PMOIndia) December 24, 2016
Every part of India has so much to offer. There are so many possibilities for tourism: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 24, 2016
Development is the solution to all problems, it is the way ahead: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 24, 2016
Performing the Jal Pujan of #ShivSmarak was very special. Glad I got the opportunity: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 24, 2016
The strength of 125 crore Indians will bring about change in this nation: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 24, 2016
Our battle to fight corruption has been going on since the day we assumed office. A historic decision was taken on 8th November: PM
— PMO India (@PMOIndia) December 24, 2016
There were efforts to mislead and even intimidate people but they supported us in the battle against corruption & black money: PM
— PMO India (@PMOIndia) December 24, 2016
The people of India will not accept corruption and black money: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) December 24, 2016