पीएम्इंडिया
माझ्या युवा मित्रांनो नमस्ते
तुम्ही वेळेचा आनंद उपभोगत आहात.
मला माहिती आहे मी कोल्ड प्ले आणि तुमच्या मध्ये व्यक्त्यय आणला आहे आणि म्हणूनच मी थोडक्यात तुमच्याशी संवाद साधणार आहे.
२०१४ मध्ये, न्यूयॉर्क मधील सेन्ट्रल पार्क येथे ग्लोबल सिटीझन महोत्सवाला उपस्थित होतो, त्यावेळी त्या कार्यक्रमाचा मी मनमुराद आस्वाद लुटला होता.
परंतु, ह्यावेळी माझ्या कामाच्या वेळापत्रकामुळे मला आज व्यक्तीशः येथे उपस्थित राहणे शक्य झाले नाही.
परंतु, हा कार्यक्रम पहिल्यांदाच भारतात होत असल्याने मला ही संधी घालवायची नव्हती म्हणूनच मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तुम्हा सर्वांसमोर उभा आहे.
तुमच्या पैकी बरेचजण ह्या आधीच माझ्या मोबाईल एपद्वारे माझ्यसोबत जोडले गेला असाल.
मी आता आणि भविष्यातही तुमचा अभिप्राय आणि सूचना जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक आहे.
मी नेहमीच तरुणांमध्ये राहण्यासाठी उत्सुक असतो.
ते मला नेहमीच ताजेतवाने आणि नवीन उर्जा प्रदान करतात.
तुम्ही मला अप्रतिम उर्जा आणि आदर्शवाद देता.
मी आता तुमच्या पासून शेकडो किलोमीटर लांब आहे तरीदेखील मी आता देखील हे अनुभवू शकतो.
माझी नेहमीची जुनी कागदपत्रे आणि थंड दिल्ली पासून मिळालेला हा एक सुंदर निवांत वेळ आहे. ह्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या ह्युग इवान्स, शिव खेमका, गौरी इस्वर्ना, पूनम महाजन आणि अन्य सर्वांचे मी अभिनंदन करतो.
सार्वजनिक धोरणं थंड करण्यासाठी हे खूपच छोटे काम आहे.
मला येथे आमंत्रित केल्याबद्दल तुमचे धन्यवाद.
तुम्ही खूप हुशार आहात कारण तुम्ही मला केवळ ह्या कार्यक्रमाला संबोधित करायला सांगितलेत गायला नाही.
आणि, मला याची पूर्ण खात्री आहे की, मी जर गायलो असतो तर तुमच्या प्रेक्षकांनी तुमच्या कडे तिकिटाचे पैसे परत मागितले असते.
आणि, त्या ही १०० रुपयांच्या नोटा.
कोणत्याही सभ्य समाजासाठी गरीबी हा अभिशाप आहे.
कुपोषण असो, बेरोजगारी असो, भ्रष्टाचार असो, अस्वच्छता असो ह्या सगळ्याचा सर्वात जास्त परिणाम गरिबांवरच होतो.
आणि म्हणूनच ‘सबका साथ, सबका विकास’ ह्या मंत्रासोबत हे सरकार गरिबांना सशक्त बनवण्याचे कार्य करीत आहे. मागील २ वर्षांपासून देशात स्वच्छतेचे महाअभियान सुरु आहे.
लोकं आपल्या आजूबाजूला स्वच्छतेच्या प्रति, कुठेही कचरा होऊ नये म्हणून जागरूक आहेत.
करोडो घरांमध्ये शौचालये बांधली जात आहेत.
शहरांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी पायाभूतसुविधा तयार केल्या जात आहेत.
जनतेच्या उत्साहाने स्वच्छता अभियानाला जन आंदोलनामध्ये परावर्तित केले आहे आणि आता हे लोकांच्या आनंदाचा भाग झाले आहे.
या अभियानात तुम्ही युवकांनी एकत्र येवून देशाला एक नवीन मार्ग दाखविला आहे.
जर कोणी वयस्क व्यक्ति कचरा करत असेल तर तुम्ही त्याला हटकले आहे त्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे.
तुम्ही स्वतः झाडू हातात घेऊन आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला आहे.
आज “वर्ल्ड टॉयलेट डे” चे औचित्य साधत तुम्ही ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे ह्यावरूनच तुमच्या आयुष्यातील प्राधान्य दिसून येते.
देशाच्या गल्ली, विभाग, गाव आणि शहरांमध्ये साफसफाई सोबतच स्वच्छता अभियानाची व्याप्ती देखील वाढली आहे.
सध्या सीमेपारची साफसफाई असो किंवा काळ्या पैशांनी भरलेल्या तिजोऱ्यांची साफसफाई असो सर्व एकदम उत्साहात सुरु आहे.
माझ्या युवा मित्रांनो, आपण एकाच पिढीमध्ये देशाला सर्व प्रकारच्या घाणी पासून मुक्ती मिळवून देवून एक स्वच्छ भारत उभारू याची मला आता शंभर टक्के खात्री पटली आहे.
तुम्ही ज्या क्षणी हा निश्चय कराल तेव्हा आपण हे नक्की करू हे देखील मला माहित आहे.
स्वच्छता अभियानामध्ये तुम्ही सर्व माझ्या खांद्याला खांदा लावून जे काम करत आहात त्यासाठी मी तुमचा खूपखूप आभारी आहे आणि भविष्यात देखील तुम्ही असेच सहकार्य कराल याची मी अपेक्षा करतो.
तुम्ही कोल्ड प्लेचा आस्वाद घ्यावा यासाठी तुमची रजा घेण्यापूर्वी मी एक कविता वाचू इच्छितो.
प्रत्येक पिढीला अनेक कलाकारांनी प्रेरित केले आहे. माझे सुध्दा काही आदर्श आहेत.
परंतु तुमच्यापैकी बरेचजण जास्तकरून बॉब ड्यालन, नोराह जॉन, क्रिस मार्टिन आणि ए आर रहेमान यांना ओळखत असाल.
मी येथे ड्यालनची एक स्थित्यांतरीत कविता वाचून दाखवू इच्छितो जी पहिल्यांदा १९६० साली गायली गेली होती जी आजच्या परिस्थितीची खूपच मिळतीजुळती आहे.
Come mothers and fathers
Through-out the land.
And don’t criticize
What you can’t understand.
Your sons and your daughters
Are beyond your command.
Your old road is rapidly aging
Please get out of the new one
If you can’t lend your hand
For the times they are a-changing.
शहाणपणाच्या शब्दांपासून मोठ्यांनी शिकावे.
वेळेनुसार ते बदलत असल्याने खरोखरच, चाकोरीबाहेर जाऊन विचार केला पाहिजे.
व्यक्तिगत स्तरावर मला नेहमीच युवा शक्तीने प्रेरित केले आहे.
भारत युवा देश आहे.
आणि आपलं भविष्य हे तुम्ही काय निवडता आणि तुम्ही काय कृती करता यावर अवलंबून आहे.
म्हणूनच, मला आशा आहे की, तुम्ही देखील ह्या क्षणाचा आनंद लुटाल आणि आपल्या देशाच्या स्थित्यंतरामध्ये सहभागी व्हाल.
कारण, क्रिसने आपल्या गाण्यात सांगितल्याप्रमाणे,
You can see the change you want to
Be what you want to be
Everything you want is a dream away
Under this pressure under this weight
We are diamonds taking shape
We are diamonds taking shape.
धन्यवाद.
आनंद लुटा
आणि देव तुम्हाला आशिर्वाद देवो.
B.Gokhale/S.Mhatre/Anagha
I know that I stand between you and Cold Play and so will make this brief: PM @narendramodi begins his remarks at @glblctznIN
— PMO India (@PMOIndia) November 19, 2016
Back in 2014, I had enjoyed attending the Global Citizen Festival in the beautiful Central Park of New York: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 19, 2016
You bring an energy and idealism that is unparalleled: PM @narendramodi https://t.co/Iy8hu3Nre5 @glblctznIN
— PMO India (@PMOIndia) November 19, 2016
गरीबी किसी भी सभ्य समाज के लिए बहुत बड़ा अभिशाप है : PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 19, 2016
कुपोषण हो, बेरोजगारी हो, भ्रष्टाचार हो, अस्वच्छता हो, इसका सबसे ज्यादा असर गरीबों पर ही पड़ता है : PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 19, 2016
पिछले दो साल से देश में स्वच्छता का महाअभियान चल रहा है : PM @narendramodi #MyCleanIndia @glblctznIN
— PMO India (@PMOIndia) November 19, 2016
My dear young friends, I am convinced we can and we will build a Swachh Bharat free of all forms of filth within one generation: PM
— PMO India (@PMOIndia) November 19, 2016
Delighted to join #GlobalCitizenIndia festival & talk about power of youth, music & the need for a Swachh Bharat. https://t.co/khcHI44JXD
— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2016