Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (एम यु टी पी) – टप्पा ३ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (एम यु टी पी) – टप्पा ३ ला मंजुरी दिली.

या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ८,६७९ कोटी रुपये इतका होता जो प्रकल्प पूर्ण होईपर्यंत १०,९४७ कोटी रुपये होईल. हा प्रकल्प १३व्या पंचवार्षिक योजने दरम्यान आगामी ५ वर्षात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

विरार-डहाणू रोड दरम्यान सध्या कार्यरत असलेल्या व्यस्त मार्गावर पश्चिम रेल्वे आपली उपनगरीय सेवा चालवत आहे. हा मार्ग मुख्य मुंबई-अहमदाबाद/ दिल्ली मार्गाचा एक भाग आहे. हा मुख्य मार्ग आधीच अतिव्यस्त असल्याने येथे या मार्गावर उपनगरीय सेवेला आणखी मार्ग जोडायला कुठेही वाव नाही. विरार-डहाणू रोड दरम्यान अतिरिक्त दुहेरी मार्ग तयार करण्याची मागणी या भागात राहणाऱ्या प्रवाश्यांकडून होत आहे. असे जाहले तर चर्चगेट ते डहाणू रोड उपनगरीय सेवेचा विस्तार होईल. पनवेल – कर्जत दुहेरी उपनगरीय मार्ग मागील काही वर्षात या भागात झपाट्याने होत असलेल्या शहरीकरण आणि वाढत्या लोकसंख्येची मागणी पूर्ण करेल. हा मार्ग कर्जत ते सी एस टी एम व्हाया पनवेल या मार्गाला पर्यायी मार्ग असेल ज्याचे अंतर सध्याच्या व्हाया कल्याण मार्गापेक्षा २३ किलोमीटरने कमी असेल यामुळे सी एस टी एम ते कर्जत प्रवासाचा धीम्या मार्गासाठी लागणारा वेळ ३५ ते ४० मिनिटांनी कमी होईल.

सध्या, कल्याण ते वाशी/पनवेल किंवा उलट दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना ठाणे स्थानकावर उतरून तेथून ट्रान्सहार्बर मार्गाने प्रवास करावा लागतो. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील आधीच गर्दीचे स्थानक असलेल्या ठाणा स्थानकावर आणखीन गर्दी होते. ऐरोली-कळवा मार्गामुळे ठाणे स्थानकावरील गर्दी कमी होईल आणि प्रवाश्यांचा वेळ देखील वाचेल.

या प्रकल्प अंतर्गत महराष्ट्रातील ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.

पी आई बी. /बी. गोखले / एस .म्हात्रे