Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मुख्यमंत्री आणि सरन्यायाधिशांच्या संयुक्त परिषदेला पंतप्रधानांनी संबोधित केले

मुख्यमंत्री आणि सरन्यायाधिशांच्या संयुक्त परिषदेला पंतप्रधानांनी संबोधित केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत मुख्यमंत्री आणि सरन्यायाधिशांच्या संयुक्त परिषदेला संबोधित केले. सर्वसामान्य जनतेचा न्यायपालिकेवर सर्वोच्च विश्वास असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला.

देशाच्या सरन्यायाधिशांनी आपल्या भाषणात देशाच्या विविध न्यायालयांत मोठ्या संख्येनं प्रलंबित असलेल्या खटल्यांचा उल्लेख केला त्याचा संदर्भ देत सरन्यायाधिशांची चिंता आपण जाणत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. सरकार आणि न्यायपालिका एकत्र येऊन या समस्येवर तोडगा काढतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कालबाह्य कायदे मोडीत काढण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांवर त्यांनी भर दिला.

N.Chitle / S.Tupe / M. Desai