Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मुळांचे रक्षण करण्याचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी समाजमाध्यमावर केले सामायिक


ज्ञान आणि दैनंदिन शिस्त ही पायाभूत मुळे सांभाळण्याचे निरतिशय महत्त्व स्पष्ट करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर प्रसिद्ध केले आहे. पंतप्रधानांनी प्रसिद्धी दिलेले सुभाषित पुढीलप्रमाणे आहे –

विप्रो वृक्षस्तस्य मूलं च सन्ध्या वेदाः शाखा धर्मकर्माणि पत्रम्।
तस्मान्मूलं यत्नतो रक्षणीयं छिन्ने मूले नैव शाखा न पत्रम्॥

 
“ज्ञानी मनुष्य एखाद्या वृक्षाप्रमाणे असतो. त्या ज्ञानवृक्षाचे मूळ म्हणजे दैनंदिन प्रार्थना. वेद म्हणजे त्याच्या शाखा (फांद्या) आणि सत्कर्मे ही त्याची पाने होत. म्हणून, मूळ काळजीपूर्वक जपले पाहिजे, कारण जर मुळाचाच विनाश झाला, तर फांद्याही तग धरू शकणार नाहीत नि पानेही जगणार नाहीत.”

एक्स वर पंतप्रधान म्हणतात;

विप्रो वृक्षस्तस्य मूलं च सन्ध्या वेदाः शाखा धर्मकर्माणि पत्रम्।
तस्मान्मूलं यत्नतो रक्षणीयं छिन्ने मूले नैव शाखा न पत्रम्॥
***
 
NehaKulkarni / JaiVaishpayan / DineshYadav
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai