पीएम्इंडिया
इथे जमलेल्या हजारो लोकांच्या जनसमुदायाला मी सर्वात प्रथम आवाहन करतो की रिओला पोहोचलेल्या आपल्या 119 खेळाडूचा उत्साह वाढविण्यासाठी आपण सर्व माझ्याबरोबर भारत मातेचा जयजयकार कराल, भारत माता की जय ,भारत माता की जय, भारत माता की जय
हे 119 खेळाडू कठोर परिश्रम घेऊन भारत मातेचा जयजयकार करण्यासाठी येथे पोहोचले आहेत .जिकंण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत प्रत्येक कसोटीतून तावून सुलाखून बाहेर पडले आहेत. तिथला विजय आपल्या नावासाठी नव्हे तर हिंदुस्थानच्या सव्वाशे कोटी देशवासियांच्या आन बान शान साठी आहे.
खेळाचे मुल्याकंन बरेच वेळा जय आणि पराजयावर ठरवलं जाते. खेळाडू झुंज देतो, आपली ताकत पणाला लावतो, देशाच्या मानसन्मानासाठी झुंज. देत राहतो, हिच त्याची कसोटी असते. सव्वाशे कोटी देशवासीयांच्या शुभकामना घेऊन हे आपले 119 खेळाडू भारताची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी स्वतःला झोकून देतील याचा मला विश्वास आहे. परदेशात आपले पथक जाते तेव्हा केवळ खेळाच्या मैदानात नव्हे तर संपूर्ण ऑलिम्पिक मध्ये खेळाडूंच्या उपस्थितीतून हिंदुस्थान प्रतीत होतो.
मला विश्वास आहे की आपले खेळाडू, आपल्या भारताचे हे पथक संपूर्ण जगाचे मन जिंकून घेईल .. आपल्या आचरणाने भारताच्या महान परंपरेचे दर्शन घडवेल. रिओमध्ये आपल्या खेळाडूंकडून आपण मोठयामोठया अपेक्षा बाळगून आहोत. एका शतकापेक्षा जास्त काळ भारत ऑलिम्पिकशी जोडला गेला आहे. कमी अधिक प्रमाणात आपल्या खेळाडूंना संधी मिळालेली आहे. मात्र सुमारे शंभर वर्षापेक्षा जास्त काळानंतर पहिल्यांदा 119 खेळाडूंचे मोठे पथक रिओमध्ये पोहोचवण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत. 2020 मध्ये टोकियो येथे ऑलिम्पिक होईल.
मी देशाच्या प्रत्येक युवकाला आवाहन करतो, हिंदुस्तानच्या 600 पेक्षा जास्त जिल्ह्यांना आवाहन करतो की प्रत्येक जिल्ह्याने संकल्प करावा की पुढच्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये केवळ माझ्या राज्यातून नव्हे तर माझ्या जिल्ह्यातूनही कोणी ना कोणीतरी टोकियोमध्ये खेळण्यासाठी पोहोचेल.
या वेळी 119 खेळाडू गेले आहेत पुढच्या वेळी 200 पेक्षा जास्त खेळाडू पाठवण्याचा संकल्प आपण आज करू शकत नाही का? ज्या खेळांशी आपला संबंध आला नाही अशा खेळात भारताच्या युवकांना तयार करण्याचे काम आपण आतापासून सुरु करू शकू का?भारताच्या युवकांमध्ये सामर्थ्य आहे,कौशल्य आहे ,संकल्प आहे,आणि मोठी मोठी स्वप्ने आहेत.या वेळी आम्हाला जास्त वेळ नाही मिळाला . आमचे सरकार येऊन 2 वर्ष झाली ,आम्ही सत्तेवर येताच संपूर्ण क्रीडा विभागाला खेळाप्रती जागरूक बनवण्याचा अभिनव प्रयत्न केला आहे.
आधीच्या तुलनेत मोठा बदल घडवून आणण्यात यशस्वी ठरलो आहोत. माझ्या देशाच्या नौजवानांनो, देशाची आन बान आणि शान याची चिंता करणाऱ्या माझ्या नौजवानांनो काही बदल असे घडवले आहेत ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की टोकियो साठी भारत कशी तयारी करत आहे.
या आधी आपले खेळाडू कोणत्या देशात खेळण्यासाठी जात असत, ऑलिम्पिकसाठी, नियम होता दोन दिवस आधी पोहोचण्याचा. जेट लॅगची समस्या असते, हवामान बदलते. दोन दिवसात तो खेळाडू तिथे स्थिरावू शकत नव्हता. त्याला लगेच खेळाच्या मैदानात उतरावे लागत असे. या वेळी आम्ही 15 दिवस आधीच खेळाडूंना रिओ ला पाठवले आहे, हे अशासाठी केले की त्यांनी तिथल्या वातावरणाशी, मैदानाशी परिचित व्हावे. तिथल्या वातावरणात स्थिर व्हावे.
माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो खेळाडू मेहनत करायला तयार असतात पण काही सोयीसुविधांची पण गरज असते. त्यांनाही वाटते, मी इथे महिनाभर राहतो 20-25 दिवस राहतो तर मला आपल्या देशाचे जेवण मिळावे. आपले खेळाडू ऑलिंम्पिकला जात असत तेव्हा त्या देशाचे पदार्थ त्यांना खावे लागत असे. या वेळी आम्ही विशेष बजेट मंजूर केले आहे. भारतीय पथकातल्या खेळाडूंना जे भारतीय पदार्थ आवडतात, त्यांचा क्रीडाप्रकार लक्षात घेता जे पदार्थ त्यांना आवश्यक आहेत ते उपलब्ध करण्याची व्यवस्था भारत सरकार करेल. त्यामुळे त्यांना छोट्या छोट्या बाबीत त्रास झेलावा लागणार नाही.
ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यानंतर क्रीडा रकान्यात टीका केली जात असे. माध्यमांमध्ये उणीदुणी काढण्याचे अभियान सुमारे 15 दिवस चालत असे, महिन्याभरानंतर हा सारा विषय विसरला जात असे. चार वर्षानंतर ऑलिम्पिक आले की मागच्या वेळी काय झाले होते त्याची आठवण केली जाते. मागच्या वेळी काय काय टीका झाली होती याचा आम्ही दोन वर्षांपासून अभ्यास सुरु केला. त्या त्रुटी दूर करण्यासाठी एक एक पाऊल उचलायला सुरवात केली. टीकेचा वापर आम्ही संधीत रूपांतर करण्यासाठी केला. या आधी ऑलिम्पिकनंतर बातम्या यायच्या की खेळाडूंबरोबर जे सरकारी अधिकारी जातात त्यांना दैनिक भत्ता म्हणून 100-100 डॉलर मिळायचे मात्र जे खेळाडू देशासाठी आयुष्यभर मेहेनत करतात त्यांना केवळ 50 डॉलर मिळायचे. आम्ही ठरवले हा भेदभाव कशाला ..अधिकाऱ्यांना 100 डॉलर आणि खेळाडूंना 50 डॉलर का बरे ..या वेळी आम्ही ठरवले पथकात जाणाऱ्या सर्वाना समान म्हणजे 100 डॉलर दिले जातील ज्यामुळे खेळाडूंना कोणतीही समस्या येऊ नये.
आपल्याकडे कौशल्य असते पण कधी कधी आंतरराष्ट्रीय खेळाची जी साधने असतात, नियम असतात, पध्दती असतात त्याच्याशी आपले खेळाडू परिचित नसतात. त्यासाठी जागतिक स्तरावर संधी मिळणे आवश्यक असते, आणि म्हणूनच या वेळी जे खेळाडू निवडले गेले आहेत, जे ऑलिम्पिकला पात्र ठरू शकतात त्यांना विचारले गेले की जगात तुम्हाला कुठे प्रशिक्षणासाठी जायचे आहे? कोणाकडून प्रशिक्षण घायचे आहे? शहर कोणते, देश कोणता, मैदान कोणते, प्रशिक्षक कोण सगळे तुम्ही ठरवा. देशाच्या खेळाडूंनी पहिल्यांदाच आपल्या पसंतीचा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक ठरवला, आपल्या पसंतीचे मैदान ठरवले, आणि भारत सरकारने एका एका खेळाडूमागे 30 लाख ते दीड कोटी रुपयांपर्यंत खर्च केला.
एके काळी ऑलिम्पिकसाठी जास्तीत जास्त 15 ते 20 कोटी तरतूद असायची या वेळी आम्ही हे बजेट जवळपास सव्वाशे कोटी पर्यंत पोहोचवले आहे. माझ्या प्रिय नौजवानांनो तुम्ही तयारी करा, शाळेतल्या बालकांनो तयारी करा, 2020 टोकियोसाठी तयारी करा.
येणाऱ्या चार वर्षात, खेळाडूच्या माध्यमातून जगात आपली आन बान शान राखण्यासाठी सरकार संपूर्ण ताकत पणाला लावेल याची खात्री मी देतो. देशाला ज्या खेळाडूंचा अभिमान आहे त्यांच्या साक्षीने खेळाच्या महान परंपरेचे स्मरण करत रिओ मध्ये ज्या क्रीडास्पर्धा होणार आहेत त्याचे यजमानपद भूषवणाऱ्या देशाला, या स्पर्धामध्ये भाग घेणाऱ्या देशांना, या स्पर्धामध्ये उत्तम कामगिरीचे दर्शन घडवणाऱ्या खेळाडूंना, सव्वाशे कोटी हिंदुस्थानी जनतेकडून अनेक अनेक शुभेच्छा.
संपूर्ण जगात बंधुतेचा संदेशही देणारा हा समारंभ सुरळीत पार पडेल आणि यजमान देशाचीही शान वाढवेल अशा शुभेच्छा मी देतो.
सव्वाशे कोटी देशवासियांकडून, हिंदुस्थानच्या 119 खेळाडूंनाही सव्वाशे कोटी देशवासियांकडून शुभेच्छा देतो. रिओला पोहोचलेल्या माझ्या खेळाडू बंधू-भगिनींनो जगभरातून बरेच खेळाडू तिथे आले असतील मात्र आपण असे आहात ज्यांच्या पाठीशी सव्वाशे कोटी जनता मनापासून उभी आहे.
15 ऑगस्टला आपण हिंदुस्थानमध्ये स्वातंत्र्याच्या 70 व्या जयंतीचा तिरंगा फडकवू या काळात रिओमध्येही रोज तिरंगा फडकविण्याचे भाग्य प्राप्त होईल असा मला विश्वास आहे. बंधू-भगिनींनो जीवनासाठी खेळ आवश्यक आहेत .आंतरराष्ट्रीय जीवनात, खेळ राष्ट्राचीही आवश्यकता बनले आहेत. या खेळा,खेले और खिले. हम भी खिले, हमारा देश भी खिले. खूप खूप शुभेच्छा .
BG/NC/AK
Every player has worked hard to get here. They will surely give their best: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 31, 2016
Am sure our athletes will win hearts the of the world and will show the world what India is about: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 31, 2016
When the 2020 games take place, let every district affirm that one athlete from our district will represent India at those games: PM
— PMO India (@PMOIndia) July 31, 2016
During our term in office so far, we have focussed tremendously on sports: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 31, 2016
This time we are sending the contingent in advance, so that players are familiar with local conditions. Earlier they got only few days: PM
— PMO India (@PMOIndia) July 31, 2016
Two years ago itself, we started to study the reasons why our sportspersons were criticised so that we had enough time to work on them: PM
— PMO India (@PMOIndia) July 31, 2016
I convey my best wishes for the Rio games. The games give a message of brotherhood: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 31, 2016
Sports is a necessity of life. Let everyone play and shine: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) July 31, 2016
The ‘Run for Rio’ in Delhi this morning was a wonderful way to wish our athletes for the 2016 @Olympics. @Rio2016_en pic.twitter.com/5dkxRQhUl0
— Narendra Modi (@narendramodi) July 31, 2016
Highlighted the steps Centre has taken, from the start of our tenure, to harness the best sporting talent & encourage our sportspersons.
— Narendra Modi (@narendramodi) July 31, 2016
I am sure our athletes will give their best at the @Olympics & make us proud of their sporting prowess. https://t.co/9gvaSkhWfU
— Narendra Modi (@narendramodi) July 31, 2016