Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मैसूर येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र–विवेक स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या आपल्या भाषणाची झलक पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवरून केले सामायिक

मैसूर येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र–विवेक स्मारकाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या आपल्या भाषणाची झलक पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवरून केले सामायिक


मैसूर (कर्नाटक) येथे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र–‘विवेक स्मारका’च्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या आपल्या भाषणाची झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यम ‘एक्स’वर शेअर केले आहेत.
पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “स्वामी विवेकानंदांच्या जीवनात मैसूरला अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. 
‘विवेक स्मारक’ हे समाजहितासाठी योगदान देण्याची प्रेरणा युवकांना देणारे एक सशक्त केंद्र बनेल, असा मला विश्वास आहे.”

“भारतीय युवकांच्या सामर्थ्यामुळे देश विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती करत आहे. आत्मनिर्भर भारत आणि ‘मेक इन इंडिया’सारख्या उपक्रमांच्या यशामागे आपल्या युवा शक्तीची ऊर्जा हीच प्रेरणादायी शक्ती आहे.”

“राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे देशातील युवकांना एकविसाव्या शतकातील गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम केले जात आहे. याचा मला अत्यंत आनंद आहे.”

***

यश राणे/ हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai