पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्या दि. 24 ऑक्टोबर 2018 ला संपूर्ण भारतातील माहिती, तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक निर्मिती व्यावसायिकांशी संवाद साधतील.
“सेल्फ4 सोसायटी” या कल्पनेवर आधारित पोर्टल माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना आणि संघटकांना सामाजिक ऐक्यासाठी एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणार असून, याद्वारे विविध प्रकारच्या सेवा एकाच व्यासपीठावरुन देता येतील. यामध्ये समाजातील दुर्बल घटकांना तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा, यासाठी हे पोर्टलची निर्मिती केली असून समाजातील अशा व्यक्ती ज्या लोकांच्या हितासाठी काही करु इच्छितात, त्यांचा सहभाग या पोर्टलच्या कार्यात घेण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधान यावेळी मोठ्या उद्योजकांची भेट घेतील तसेच माहिती तंत्रज्ञान व्यवसायिकांना आणि आयटी क्षेत्रातील कर्मचारी तसेच इलेक्ट्रॉनिक निर्मिती करणाऱ्या संघटनांना संबोधित करतील. भारतातील जवळपास 100 विविध स्थानांवरुन माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक निर्मितीतील व्यावसायिक या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
B.Gokhale/P.Malandkar
Tomorrow afternoon, I eagerly look forward to taking part in an interesting programme, a Town Hall-style interaction with IT professionals, technocrats and tech-enthusiasts from all over India to launch the ‘मैं नहीं, हम’ portal and App. pic.twitter.com/SWpYF4PE5s
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2018
The ‘मैं नहीं, हम’ portal is based on the principle of #Self4Society, which will bring together IT professionals and organisations to work for various social causes and bring a positive difference in the lives of our fellow citizens. https://t.co/qE2AObO7kx
— Narendra Modi (@narendramodi) October 23, 2018