पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मास्कोमधल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्राला (एनसीएमसी) भेट दिली. या केंद्राची प्रत्यक्ष कार्यपध्दती आणि देखरेख कार्याचे अवलोकन पंतप्रधानांनी केले. विविध आपत्ती निवारण संस्थांमध्ये, या केंद्रामार्फत समन्वय कसा राखला जातो याविषयीची माहिती पंतप्रधानांना तपशीलवार देण्यात आली. अवकाश देखरेख 3-डी मॉडेलिंग क्षमतेबाबतही पंतप्रधानांना माहिती दिली गेली. रशिया आणि सीमेबाहेरील मानवी जीविताला आणि मालमत्तेला नैसर्गिक आपत्तींसह असलेल्या धोक्याच्या वेळी हे केंद्र कसे देखरेख ठेवते, तसेच केंद्राच्या सहकार्याचा जागतिक आवाका अधोरेखित करण्यात आले.
आपत्ती रोखण्यासाठी तसेच त्यासंदर्भातल्या प्रतिसादासाठी केंद्रातर्फे राखण्यात येणाऱ्या समन्वय कार्यात पंतप्रधानांनी औत्सुक्य दर्शविले. या केंद्रातर्फे केले जाणारे कार्य म्हणजे मानवतेची मोलाची सेवा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल, परराष्ट्र सचिव एस. जयशंकर, संरक्षण सचिव जी. मोहन कुमार आणि पंतप्रधानांच्या शिष्टमंडळातले इतर वरिष्ठ सदस्य यावेळी उपस्थित होते. आणीबाणीच्या धोक्याबाबत जनतेला इशारा देण्यासाठी तसेच विविध एजन्सींमधल्या समन्वयासाठी एनसीएमसी बहुस्तरीय समन्वय केंद्र निर्माण करण्यात आले आहे. देखरेख ठेवणे, माहिती संकलन, विश्लेषण क्षमता या केंद्रात आहे. हे केंद्र दूरसंवेदकावर आधारित जागतिक दिशादर्शक उपग्रह प्रणाली आणि जागतिक देखरेख तंत्रज्ञानाचा वापर करते.
N.Chitale/B.Gokhale
PM @narendramodi at EMERCOM, the Russian National Crisis Management Centre. pic.twitter.com/AoCiLg2eU5
— PMO India (@PMOIndia) December 24, 2015
Visit to EMERCOM was a great learning experience. Was shown aspects relating to disaster management & how technology is used in this field.
— Narendra Modi (@narendramodi) December 24, 2015
The NCMC is doing a big service to humanity. Their disaster prevention & response activities are laudatory. https://t.co/cqHoklY9iv
— Narendra Modi (@narendramodi) December 24, 2015