Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मोझाम्बिक बरोबर दीर्घकालीन कंत्राटाच्या माध्यमातून डाळींची आयात करायला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मोझाम्बिक बरोबर खासगी कंपन्यांच्या माध्यमातून किंवा सरकारच्या माध्यमातून दीर्घ काळ डाळींची आयात करण्यासाठी सामंजस्य करार करायला मंजुरी दिली. या डाळींच्या व्यापाराला प्रोत्साहन देऊन तूर डाळ आणि अन्य डाळींच्या उत्पादनाला चालना देणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे. पाच आर्थिक वर्षांसाठी तूर आणि अन्य डाळींच्या निर्यातीचे उद्दिष्ट निश्चित करून २०१६-२०१७ मधील १ लाख टनावरुन २०२०-२१ पर्यंत २ लाख टनापर्यंत नेण्याचा यात समावेश आहे.

या करारामुळे भारतात डाळींची उपलब्धता वाढेल आणि किमती स्थिर राहण्यास मदत होईल.

देशात २०१५-१६ वर्षात सुमारे १७ दशलक्ष डाळींचे उत्पादन झाले असून ५. ७९ दशलक्ष टन डाळीची आयात करण्यात आली. मात्र देशी उत्पादन आणि आयात केलेली डाळ स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरी ठरली. त्यामुळे २०१५-१६ वर्षात डाळीचे भाव वाढले.

S.Kane/B.Gokhale