Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मोत्याची कलात्मक कलाकृती पंतप्रधानांना भेट

मोत्याची कलात्मक कलाकृती पंतप्रधानांना भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज मोत्यांच्या सहाय्याने बनविलेली अद्वितीय कलाकृती भेट देण्यात आली. या कलात्मक कलाकृतीमध्ये भारताचा नकाशा असून त्यामध्ये पंतप्रधानांची प्रतिमा रेखाटण्यात आली आहे.

कलाकार खुशबू आकाश दावडा यांनी ही कलाकृती तयार केली असून त्यासाठी पाच लाख मोत्यांचा वापर केला आहे. या कार्यासाठी खुशबू यांनी 10 किलोमीटर लांब धागा वापरला. सात फूट लांब आणि सात फूट रुंद अशी ही कलाकृती असून, ती बनवण्यासाठी 850 तास लागले.

कलाकृती पंतप्रधानांना सादर करताना राजकोटचे खासदार मोहनभाई कुदरिया उपस्थित होते.

B.Gokhale/S.Bedekar/Anagha