Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

म्यानमारचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्‍लीमध्ये संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेतील महत्त्वपूर्ण मुद्दे

म्यानमारचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्‍लीमध्ये संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेतील महत्त्वपूर्ण मुद्दे


सन्माननीय राष्ट्रपती यू हिंन क्याव आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी,

भारत भेटीसाठी आलेले म्यानमारचे राष्ट्रपती यू हिन क्याव आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाचे स्वागत करण्यास मला आनंद होत आहे.

• परदेशात द्विपक्षीय सामंजस्य करार करण्यासाठी आपण भारताची प्राधान्याने निवड केली. आपण दिलेल्या सन्मानाबद्दल मनापासून आनंद व्यक्त करतो.

मित्रांनो,

• म्यानमार आपल्यासाठी विशेष-खास देश आहे.

• भारत आणि दक्षिण-पूर्व आशियाला जोडणारा एक सेतू म्हणजे म्यानमारची भूमी आहे.

• सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ऋणानुबंधामुळे उभय देशातील संबंधाचा पाया अधिक मजबूत आहे.

• आमच्या जीवनशैलीचा भाग म्हणजे बुद्धांनी दिलेली प्रेमाची आणि दयेची शिकवण, सर्व पंथ समभाव, समानतेची शिकवण हेच साऱ्या धर्माचं सारतत्व आहे.

माननीय,

• तुमच्या महान राष्ट्राने आता नवीन युगात प्रवेश केला आहे.

• अर्थात हे नवीन युग म्हणजे तुमच्या प्रगल्भ नेतृत्वाचे आहे. लोकशाहीबद्दल, आपल्या देशातील जनतेविषयी तुमच्याठायी असलेल्या निष्ठेचे नवीन युग आहे.

• या नवीन युगाला जोड तुमच्या व्हिजनची आणि दृढ इच्छाशक्तीची आहे. त्यामुळे आपल्या नेतृत्वाखाली म्यानमारला स्थिरता प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे आणि त्याचबरोबर या क्षेत्रात आर्थिकदृष्ट्या भरभराट पावणारा हा देश ठरणार आहे.

म्यानमारच्या नवीन सरकारने आपली वाटचाल सुरू करताना

• कृषी क्षेत्राची वृध्दी

• उद्योग आणि पायाभूत सुविधांचा विकास

• शिक्षणक्षेत्र सुधारण्यावर भर

• युवकांना कौशल्य प्रदान करणे

• नवीन संस्थांची उभारणी आणि असलेल्या संस्थांना अधिक सक्षम करणे

• सामाजिक संरक्षण

• आर्थिक भरभराटीवर ठोस योजनांद्वारे मार्ग तयार करणे आणि वर उद्‌घृत केलेली कार्ये करणे

• आधुनिक राष्ट्र निर्माणाला महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचा पाठपुरावा करणे.

• आपण दोन्ही राष्ट्रे भागीदार आहोत आणि मित्रही आहोत. त्यामुळं सव्वाशे कोटी भारतीय जनता आपल्याला बरोबरीने प्रत्येक पावलावर साथ देईल, सहकार्याचा हात देईल अशी मी ग्वाही इथं देतो.

मित्रांनो,

• उभय देशात होणारे सामंजस्य करार, इतर कार्यक्रमांविषयी राष्ट्रपती आणि मी आताच अतिशय उपयुक्त ठरणारी चर्चा केली.

• सुरक्षेचा प्रयत्न आपल्या दोन्ही देशांच्या दृष्टीने सारखाच आहे, हे आमच्या लक्षात आले आहे.

• आणि म्हणूनच सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयावर दोन्ही देशांनी संयुक्त व्यूहरचना करण्याचे मान्य केले आहे.

• या दृष्टीने आपल्या लोकांच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी आम्ही एकत्रित कार्य करण्याचा निर्णय राष्ट्रपती आणि मी घेतला आहे.

• क्षेत्रातील घुसखोरीच्या कारवायांचा बिमोड करण्यासाठी आणि दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी म्यानमार आणि भारत एकमेकांना सक्रीय सहकार्य करणार आहेत.

• 21 व्या शतकातील पांगलाँग परिषदेत ठरल्याप्रमाणे शांतता प्रक्रियेला भारताचा संपूर्ण पाठिंबा असणार आहे.

मित्रांनो,

• भारत आणि म्यानमार यांच्यातील सहकार्य फक्त चांगले शब्द व्यक्त करण्याइतके मर्यादित नाही. तर त्याची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. सहकार्य, सहभागीता याचबरोबर ‘सर्वात प्रथम माणूस महत्त्वाचा’ हे तत्त्वज्ञान दोन्ही देशांचे समान आहे. मानवाला केंद्रस्थानी मानून सहकार्य करण्यावर उभय देशांचा भर आहे.

• म्यानमारमधील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी भारताने केलेली गुंतवणूक आता 2 अब्ज डॉलरपर्यंत गेली आहे.

• यामध्ये दूरसंचार, दळणवळण, पायाभूत सुविधा, शिक्षण क्षेत्राची क्षमता वाढविणे, आरोग्य आणि इतर विविध क्षेत्राचा समावेश आहे.

आमच्या भागीदारीतून उभे राहत असलेल्या प्रकल्पांची काही ठोस उदाहरणे:-

• बंदर आणि जलमार्ग या क्षेत्रामध्ये सुरू केलेले कलादान प्रकल्प यावर्षी पूर्णत्वाच्या मार्गावर

• भारत-म्यानमार-थायलंड या त्रिपक्षीय महामार्ग

• म्यानमार इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी

• कृषी संशोधन आणि शिक्षण देणारे अत्याधुनिक केंद्र तसेच

• आरोग्य, शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण क्षेत्रातील लघुप्रकल्प

• आज उभय देशात दोन करारांवर स्वाक्षरी झाल्या. यामध्ये 69 पुलांचा दर्जा सुधारणे आणि त्रिपक्षीय महामार्ग प्रकल्पातील कलेवा ते यार्गी या रस्त्यांचे काम करणे.

• याशिवाय कृषी, बँकिंग, ऊर्जा आणि वीज या क्षेत्रामध्ये अधिक सहकार्य करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

• उभय देशांना किफायतशीर ठरेल अशा पध्दतीने डाळींचा व्यापार करण्याविषयी दीर्घकालीन योजना तयार करण्याचे आज मान्य करण्यात आले.

• भारत-म्यानमार मैत्रीपर्वात एक पाऊल पुढे टाकण्याच्या उद्देशाने यावर्षी एप्रिलमध्ये म्यानमारमधील तामू या गावाला भारताने विद्युत पुरवठा केला.

• भारत आणखी काही गावांना वीज पुरवठा करू इच्छित असल्याचे मी राष्ट्रपतींना सांगितले.

महोदय,

• म्यानमारबरोबरचे मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करून वेगवेगळ्या क्षेत्रात ते विस्तारीत करू इच्छिते.

• म्यानमार सरकारच्या प्राधान्यक्रमाचाही विचार यावेळी भारत नक्कीच करेल.

मित्रांनो,

• आमच्या मैत्रीचा पाया सांस्कृतिक दृष्टयाही मजबूत आहे.

• या सहकार्यातूनच म्यानमारमधील बागान इथल्या आनंदा मंदिराची पुनर्स्थापना करण्यात येत आहे.

• गेल्या आठवड्यातील भूकंपाच्या धक्क्यात म्यानमारमधील ऐतिहासिक वास्तू आणि पॅगोडा यांचे थोडे नुकसान झाले आहे, या वास्तुंचीही पुनर्स्थापना करण्यास भारत तयार आहे.

महोदय,

• आपण अतिशय सुयोग्यवेळी भारत भेटीवर आले आहात.

• या दौऱ्यामुळे आपल्या सहकार्याच्या कार्यक्षेत्राची दिशा, आराखडा निश्चित करण्यावर आपण चर्चा करू शकलो.

• भविष्यात आपल्याकडून असेच सहकार्य मिळत राहील, अशी आशा असून उभय देशाचे मैत्रीपर्व नवीन कीर्तिमान स्थापित करतील.

• म्यानमारचे उज्ज्वल भवितव्य घडवण्याचा तुमचा जो उद्देश आहे, तो आता आपल्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी बनली आहे.

महोदय,

पुन्हा एकदा, भारत तुमचे मनापासून स्वागत करतो.

धन्यवाद!

मनापासून धन्यवाद!!

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor