पीएम्इंडिया
म्यानमारमधल्या यमेथीन इथल्या महिला पोलीस प्रशिक्षण केंद्राचा दर्जा आणखी उंचावण्यासाठीच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मान्यता दिली आहे. 6 सप्टेंबर 2017ला या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
म्यानमार सरकारला, पोलीस दलाच्या क्षमता वृद्धिगत करण्यासाठी, यमेथीन महिला पोलीस प्रशिक्षण केंद्राचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी, भारत सरकारकडून तांत्रिक आणि वित्तीय सहाय्य, या सामंजस्य करारांतर्गत पुरवण्यात येणार आहे.
N.Sapre/N.Chitale/Anagha