Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रस्ते वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रात भारत आणि संयुक्त अरब अमिरातीतील द्विपक्षीय सहकार्यासाठी सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मान्यता


रस्ते वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रात भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात द्विपक्षीय सहकार्यासाठी होणाऱ्या सामंजस्य कराराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रस्तावित सामंजस्य करारामुळे भारत आणि संयुक्त अरब अमिरातीतील सहकार्य, देवाण-घेवाण वृद्धिंगत होणार आहे. तसेच पायाभूत सुविधांच्या विकासातील गुंतवणुकही वाढणार आहे. सुरक्षित, स्वस्त, चांगली आणि पर्यावरणपूरक रस्ते वाहतुकीला चालना मिळायला यामुळे मदत मिळणार आहे. या क्षेत्रात सहकार्यासाठी संस्थात्मक यंत्रणा दोन्ही देशात स्थापन व्हायलाही यामुळे मदत मिळणार आहे. या कराराची काही वैशिष्ट्ये : –

• वाहतूक तंत्रज्ञान आणि प्रवाशांसाठी वाहतूक धोरणे तसेच मालवाहतूक या क्षेत्रात माहिती आणि सहकार्याची देवाणघेवाण

• रस्ते पायाभूत सुविधांचे नियोजन, प्रशासन आणि व्यवस्थापन रस्ते/महामार्ग बांधणी आणि देखरेखीचे निकष

• रस्ते सुरक्षेतील सर्वोत्तम पद्धतींच्या योजनांची, धोरणांची देवाणघेवाण आणि रस्ते अपघातामुळे होणाऱ्या जखमींचे, मृतांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना

• टोलसंबंधीच्या सर्वोत्तम पद्धतींची, आधुनिक, यंत्रणा, तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक टोल जमा यंत्रणा याबाबत माहितीची देवाणघेवाण

• रस्ते आणि पूल बांधणीतील सुधारित तंत्रज्ञान व सामग्रीबाबतची देवाणघेवाण, यात संयुक्त संशोधनाचाही समावेश आहे.

• लॉजिस्टिक पार्कस उभारण्यासाठी गुंतवणुकीला चालना देणे, वाहतूक गोदामे, मूल्यवर्धित सेवा याबाबत सहकार्य आणि माहितीची देवाणघेवाण इत्यादींचा समावेश आहे.

B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar