Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राजकोट इथल्या सामाजिक अधिकारिता शिबिराला पंतप्रधानांनी केले संबोधित , दिव्यांगांना साहाय्य साधने आणि उपकरणे प्रदान

राजकोट इथल्या सामाजिक अधिकारिता शिबिराला पंतप्रधाना नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले. दिव्यांग लाभार्थीना साहाय्य साधने आणि उपकरणेही त्यांनी प्रदान केली.

देशातल्या गरिबांसाठी केंद्र सरकार पूर्णपणे समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले .

दिव्यांग बंधुभगिनींच्या जीवनात नावीन्य आणि तंत्रज्ञानाद्वारे कसा बदल घडवता येऊ शकेल यासाठी मार्ग शोधण्याचे आवाहन त्यांनी स्टार्ट अप क्षेत्राला केले.

केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की दिव्यांग बंधुभगिनींच्या कल्याणासाठी ते करत असलेले काम ऐतिहासिक आणि कौतुकास्पद आहे.

वर्ष २०२२ पर्यंत , आपल्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांपर्यंत प्रत्येक भारतीयाला घर मिळाले असले पाहिजे आणि त्या घरात योग्य सुविधा असल्या पाहिजेत याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

B.Gokhale/S.Kakde/P.Kor