Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राजकोट विमानतळाच्या शिलान्यास कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांचे भाषण

राजकोट विमानतळाच्या शिलान्यास कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांचे भाषण

राजकोट विमानतळाच्या शिलान्यास कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांचे भाषण

राजकोट विमानतळाच्या शिलान्यास कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांचे भाषण


मोठ्या संख्येने उपस्थित सुरेंद्र नगर जिल्ह्यातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. ज्याच्याकडे घर नाही अशा एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही विचारल की, तुला घर हवे आहे का? त्याचे उत्तर हो असे असेल. त्या गरीब व्यक्तीला घर द्यायचे आहे, त्याच्यासाठी राहण्याची चांगली सोय करायची आहे आणि विकासाशिवाय हे शक्य नाही. विकास आधीपण होत होता परंतु तेव्हा एखाद्या गावात किंवा एखाद्या विभागात एखादा हँडपंप बसवला त्यानंतर तो नेता येणाऱ्या तीन तीन निवडणुकांमध्ये सारखा सांगत राहायचा की, बघा मी तुमच्यासाठी हँडपंप बसवला आहे. मला ह्या निवडणुकीमध्ये विजयी करा मी तुमचा विकास केला आहे. याचा अर्थ एक हँडपंप बसवणं म्हणजे विकास का? विकासाची व्याख्या एवढीच होती ?

आज एक असे सरकार कार्यरत आहे जे एक मोठ्या पाईपलाईनच्या सहाय्याने नर्मदा नदीचे पाणी गावा गावांमध्ये,घर घरापर्यंत पोहोचवत आहे. संपूर्ण गुजरातमध्ये नर्मदा योजनेमुळे सर्वात अधिक लाभ कोणाला होणार आहे, त्या जिल्ह्याचे नाव आहे. काय नाव आहे त्या जिल्ह्याचे? काय नाव आहे? त्या जिल्ह्याचे नाव आहे सुरेंद्र नगर. नर्मदेच पाणी या वाळलेल्या धरणीचे नंदनवन बनवण्यासाठी नर्मदा माता तुमच्या घरापर्यंत आली आहे. आणि केवळ ग्रामीण आणि कृषी जीवनातच नर्मदेचा प्रभाव होईल असे नाही. पाण्यात अशी एक शक्ती आहे ज्याच्या जोरावर भविष्यात नर्मदेच्या पाण्यामुळे सुरेंद्र नगर जिल्हा औद्योगिक विकासाचे एक मोठे केंद्र म्हणून उदयाला येईल. रोजगाराच्या सर्वाधिक संधी सुरेंद्र नगर जिल्ह्यात उपलब्ध होतील. शिक्षणाचे सर्वात मोठे मंदिर इथे उभे राहील. कारण जेव्हा मुबलक पाणी असते तेव्हा तिथे पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी सरकारला देखील हिंमत येते; आणि हे विमानतळ उभारण्याचा उद्देश देखील हाच आहे. भविष्यात सुरेंद्र नगर जिल्हा आणि राजकोट जिल्हयामध्ये स्पर्धा होणार आहे. स्थानचा विकास होईल, मोरचा विकास होईल आणि ही निकोप स्पर्धा असेल, विकासासाठीची स्पर्धा असेल. आणि म्हणूनच वेगाने विकास होणाऱ्या सुरेंद्र नगर आणि राजकोट जिल्ह्याच्या मध्यभागी भारत सरकार करोडो रुपये खर्च करून हे भव्य विमानतळ उभारत आहे आणि त्याचाच शिलान्यास आज करण्यात आला आहे. काही लोक ओ आहेत ज्यांना यामध्ये देखील वाईटच दिसत असेल. त्यांना सांगा बसने जा विमानाने का जात आहेस? तेव्हा ते सांगतील की, नाही लवकर पोहचायचे आहे. तुम्हाला लवकर जायचे आहे, मग लोकांना नाही जाऊ देणार का?

सामान्य माणूस देखील आज विमानाने प्रवास करू शकतो. पूर्वी विमान प्रवास हा केवळ राजा महाराजांसाठी असायचा तो काळ आता बदलला आहे आणि म्हणूनच मी सांगितले होते मी देशाच्या हवाई क्षेत्राचा असा विकास करू इच्छितो की, हवाई चप्पल घातलेला व्यक्ती देखील विमानाने प्रवास करू शकेल. आज संपूर्ण जगात उड्डयन क्षेत्र महत्वपूर्ण आहे. परंतु भारताच्या स्वातंत्र्या नंतर हवाई वाहतूक धोरण तयार करण्यातच आले नाही. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही हवाई वाहतूक धोरण तयार केले आणि अहमदाबाद, मुंबई, चेन्नई यासारख्या मोठ्या मोठ्या नाही तर छोट्या छोट्या ठिकाणी विमान प्रवास कशाप्रकारे सुरु करता येईल यावर काम केले. जिथे दूरवर संपर्काचे काहीच साधन नाही. तिथे १ तासाचा प्रवास असेल आणि या एक तासाच्या प्रवासासाठी तिकिटाचे दर अडीच हजार ठरवण्यात आले आहेत आणि या प्रकारे हवाई वाहतुकीला प्रोत्साहन देवून 8 मार्ग सुरु करण्यात आले आहेत. गुजरात मध्ये देखील कांडलाला फायदा होत आहे. मिठापुरला फायदा होत आहे.यामुळे भविष्यात छोट्या छोट्या स्थळांना त्याचा लाभ मिळणार आहे. आज भारतात अशी राज्य आहेत जिथे 2 किंवा 3 विमानतळ आणि धावपट्या आहेत. भविष्यात अशी स्थिती येईल की, एका एका राज्यात दहा-दहा, पंधरा-पंधरा, वीस-वीस विमानतळ कार्यरत असतील. आणि आताच्या ताज्या आकडेवारीनुसार विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या संख्येत 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि ही खूपच आनंदाची बातमी आहे. आणि म्हणूनच राजकोटमध्ये हा ग्रीनफील्‍ड प्रकल्प होत आहे.

मी गुजरातचे या प्रदेशातील नागरिकांचे अभिनंदन करतो. आणि मला आनंद आहे की, इतक्या मोठ्या प्रकल्पासाठी केवळ 4 टक्के जमीन शेतकऱ्यांकडून संपादित करावी लागली. 4 टक्के, उर्वार्रीत 96 टक्के जमीन नापीक होती त्या जमिनीवर विमानतळ उभारण्याचा निर्णय झाला आहे. सुरेंद्र नगर मधील जमीन आता शेतीच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे आणि म्हणूनच नापीक जमिनीला पसंती देण्यात आली. आता विजय भाई राजकोटच्या विमानतळा बद्दल बोलत होते त्याच्या क्षमतांबद्दल सांगत होते.

भविष्यामधील गरजा लक्षात घेऊन राजकोट आणि या संपूर्ण प्रदेशाचा ज्याप्रकारे विकास होत आहे ते पाहता तो दिवस दूर नाही जेव्हा इथून आंतरराष्ट्रीय सेवा देखील सुरु होईल. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जायचे असेल तर राजकोट चौटीलाच्या या विमानतळावरून जाऊ शकतात. हे खूप महत्वाचे काम आज होत आहे.

B.Gokhale/S.Mhatre/Anagha