पीएम्इंडिया
राजस्थानमधे पशुवैद्यकीय विद्यापीठ प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र उभारण्यासाठी टोंक जिल्ह्यातल्या अविकानगर इथली केंद्रीय मेंढी आणि लोकर संशोधन संस्थेची 50 एकर जमीन राजस्थान सरकारला द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळानं हिरवा कंदिल दाखवला आहे. बिकानेरच्या पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान राजस्थान विद्यापीठातर्फे हे संशोधन केंद्र उभारले जाणार आहे.
या केंद्रामुळे विद्यापीठ आणि केंद्रीय मेंढी आणि लोकर संशोधन केंद्रातलं सहकार्य दृढ होऊन त्याचा परस्परांना लाभ होणार आहे.
N. Chitale / S.Tupe / M. Desai