Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह यांच्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले आभार


नवी दिल्‍ली, 10 जून 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (10 जून) राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह यांचे त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानले. अधिक समर्पणाच्या भावनेतून, एकनिष्ठ आणि वचनबद्ध राहून देशासाठी काम करण्याची प्रेरणा हा प्रसंग देतो, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

‘सब का साथ, सब का विकास’ या मंत्राला अनुसरून सरकार भारताच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहे, यावर मोदी यांनी भर दिला.

समाज माध्यम एक्स वरील आपल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे,

“शुभेच्छांबद्दल तुमचे हार्दीक आभार, माननीय हरिवंश जी. अधिक समर्पणाच्या भावनेतून, एकनिष्ठ आणि वचनबद्ध राहून देशासाठी काम करण्याची प्रेरणा हा प्रसंग देतो. ‘सब का साथ, सब का विकास’ हा मंत्र घेऊन आम्ही भारताच्या चौफेर विकासासाठी बांधील आहोत.

@harivansh1956”

 

* * *

नेहा कुलकर्णी/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai