पीएम्इंडिया
राज्यसभेच्या निवृत्त होत असलेल्या सर्व सदस्यांच्या योगदानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली असून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
निवृत्त होत असलेले सदस्य सामाजिक जीवनात अधिक प्रभावी भूमिका बजावतील, असा विश्वास पंतप्रधानांनी राज्यसभेतल्या निरोप समारंभात व्यक्त केला. निवृत्त होत असलेल्या प्रत्येक सदस्याचे वेगळे महत्व असून प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिले आहे, असे ते म्हणाले. देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी त्यांच्या क्षमतांनुसार उत्तम काम केले असून त्यांचे योगदान देश कधी विसरु शकणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले.
ज्येष्ठ सदस्य असलेल्या वरिष्ठ सभागृहाचे विशेष महत्व आहे. धोरणनिर्मितीत ते महत्वाची भूमिका बजावते, असे त्यांनी सांगितले.
निवृत्त होणाऱ्या अनेक सदस्यांचा आणि त्यांच्या योगदानाचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला.
प्रलंबीत तीन तलाक सारख्या महत्वाच्या निर्णयप्रसंगी संसदेचे सदस्य संसदेचा भाग नव्हते,याबाबत पंतप्रधानांनी खंत व्यक्त केली.
निवृत्त होत असलेल्या सदस्यांसाठी संसदेची तसेच पंतप्रधान कार्यालयाची दारे सदैव खुली असतील असे सांगून महत्वाच्या मुद्यांवर विचार मांडण्याचे आवाहन पंतप्रधानांनी त्यांना केले.
B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar
We bid farewell to some of our MP colleagues in the Rajya Sabha. They have contributed significantly to Parliament and we have all gained from their experience and insight: PM @narendramodi in the Rajya Sabha
— PMO India (@PMOIndia) March 28, 2018
The Rajya Sabha is a distinguished House, with eminent members serving here. This House plays a vital role in our democracy: PM @narendramodi https://t.co/0Tbiv8imV6
— PMO India (@PMOIndia) March 28, 2018
We will always remember the distinguished work of Parasaran Ji. Who can forget the manner in which Professor Kurien has contributed to the Rajya Sabha: PM @narendramodi in the Rajya Sabha
— PMO India (@PMOIndia) March 28, 2018
We will always remember the distinguished work of Parasaran Ji. Who can forget the manner in which Professor Kurien has contributed to the Rajya Sabha: PM @narendramodi in the Rajya Sabha
— PMO India (@PMOIndia) March 28, 2018