पीएम्इंडिया
आदरणीय सभापती, सन्मानीय सदन
आपल्यातले काही साथीदार आता हा अनुभव घेऊन समाजाची अधिक जोमाने सेवा करणार आहेत. या सदनातून निरोप मिळत असलेल्या प्रत्येक सदस्याचे आपापले योगदान आहे. प्रत्येकाची महती आहे आणि या सदनात राहून देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपापल्या परीने योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना देश कधी विसरु शकत नाही.
तुमच्या सर्वांच्या उत्तम सेवेसाठी तुमचे अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा.
हे सदन अशा ज्येष्ठ सदस्यांचे आहे, ज्यांच्या जीवनाचा अनुभव सदनासाठी मौलिक योगदान आहे. समाज जीवनाच्या आशा आकांक्षानां निष्पक्षपणे तराजूत तोलून भविष्यातल्या समाजव्यवस्थेसाठी काय योग्य ठरेल, काय योग्य ठरणार नाही, त्याचा लेखाजोखा करण्याचे सामर्थ्य या वरिष्ठ सदनात असते, ज्येष्ठ सदस्यांमुळे ते असते आणि म्हणूनच इथे जे बोलले जाते त्याला एक विशेष महत्व, मूल्य असते. आपल्या धोरणनिश्चितीमध्ये ते महत्वाची भूमिका बजावत असते.
आपल्यामध्ये आदरणीय पराशरण जी यांच्यासारखे सदस्य आहेत, जे जीवनात व्यावसायिकतेबरोबरच तपस्वी मुनींचे जीवनही जगले. असे लोक आपल्यामध्ये होते. आता या सदनात आपल्याला त्यांचा सहवास मिळणार नाही.
संपूर्ण देशाला ज्यांचा अभिमान आहे, असे दोन खेळाडू माननीय दिलीपजी आणि सचिनजी या सदनात होते. हे सदन आता त्यांच्या सहवासाला मुकणार आहे. प्राध्यापक कुरियन साहेबांची सर्वजण नेहमी आठवण काढतील. त्यांचा हसरा चेहरा, त्यांच्यापासून हे शिकले पाहिजे की आपल्याला जे सांगायचे आहे, तेच सांगायचे आहे, मात्र ते हसत हसत सांगायचे आहे. त्यांचा हा गुणविशेष होता आणि त्यामुळेच संकटाच्या काळातही सदनाचे कामकाज ठिकठाक चालवण्यात त्यांची भूमिका महत्वाची राहिली.
ज्यांचे कुठल्या पक्षाशी आणि पक्षाच्या विचारधारेशी नाते नाही, असे लोक आपल्यात खूप कमी जण आहे, हे खरेच. कुठली न कुठली पार्श्वभूमी असलेले असेच आपण बहुतांश जण आहोत आणि त्यामुळे त्या गोष्टी इथे प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रयत्न करणेही स्वाभाविक आहे.
मात्र जे कनिष्ठ सभागृहात घडते ते वरिष्ठ सभागृहात झाले पाहिजे, हे अशी अपेक्षा बाळगणे गरजेचे नाही. कारण वरिष्ठ सदनाचे स्वत:चे एक महत्व असते आणि त्यांनी आपापली भूमिका निभावली पाहिजे.
मला वाटते, कदाचित आपल्यातल्या अनेक जणांनी ठरवले असेल की, जेंव्हा शेवटचे अधिवेशन असेल तेव्हा मी हा विषय मांडेन, मी , जाता जाता अशी ऐतिहासिक तयारी करुन जाईन, मी असे विचार मांडेन जे देशासाठी महत्वाच्या असणाऱ्या कामासाठी योगदान ठरतील. मात्र ते भाग्य निरोप घेताना बहुतेक तुम्हाला मिळाले नाही. ती इथली जबाबदारी नाही. तुम्हाला असेच जावे लागत आहे, ही इथून इथपर्यंत आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
जाण्यापूर्वी कुठल्या महत्वाच्या निर्णयात अतिशय उत्तम प्रकारची भूमिका निभावण्याची, जाताजाता उत्तम ठसा उमटवण्याची संधी तुम्हाला मिळाली असती तर तुम्हाला विशेष समाधान मिळाले असते. मात्र यापासून या सदनातील कारणांमुळेच तुम्हाला वंचित रहावे लागत आहे. आजची पण ही संधी गमावली जातेय की काय, असे काल वाटत होते. मात्र सभापती महोदयांनी खूप मेहनत घेतली. सर्वांना समजवण्याचा प्रयत्न केला. माननीय विजयजींनीही प्रयत्न केला. त्यामुळे निरोप घेणाऱ्या सर्व सदस्यांना आज आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली. तुमच्या कार्यकाळात तुम्हाला संधी मिळाली तेंव्हा तुम्ही त्याचा उपयोग केलात. मात्र जाता जाता एखाद्या महत्वपूर्ण निर्णयात योगदान, इतिहासात ज्याची आठवण राहील, अशी संधी तुम्हाला मिळाली नाही.
तीन तलाकसारखा महत्वाचा निर्णय, जो हिंदुस्तानाच्या आगामी काळात खूप मोठी भूमिका बजावणार आहे, त्या निर्णयाच्या प्रक्रियेपासून तुम्ही वंचित राहिलात. जे परत आले आहेत, त्यांना तर हे भाग्य मिळेल मात्र जे जात आहेत त्यांना या ऐतिहासिक, महत्वाच्या क्षणापासून वंचित राहावे लागले, याची खंत मनात आज नाही तर 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 25 वर्षांनी नक्की वाटेल असे मला वाटते. या सगळ्या गोष्टी आपण करु शकलो असतो तर बरे झाले असते.
जे सदस्य निवृत्त होत आहेत या सर्व माननीय सदस्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. या सदनाचे सदस्यत्व संपले म्हणजे या संपूर्ण परिसराचे दरवाजे बंद झाले, असे तुम्ही मानू नका. तुमचा साथीदार म्हणून तुम्हाला हे आग्रहाचे सांगणे आहे. या परिसराचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत. पंतप्रधान कार्यालय खुले आहे.
देशाच्या हितासाठी तुमच्या मनात विचार आले तर नक्की या. तुमचे विचार ऐकून घेण्यात, समजून घेण्यात मला आनंद वाटेल. तुम्ही कुठेही असलात तरी तुमच्या विचारांचे योगदान द्या, मी ते पुढे पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन.
तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मन:पूर्वक धन्यवाद देतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो.
*****
B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar
We bid farewell to some of our MP colleagues in the Rajya Sabha. They have contributed significantly to Parliament and we have all gained from their experience and insight: PM @narendramodi in the Rajya Sabha
— PMO India (@PMOIndia) March 28, 2018
The Rajya Sabha is a distinguished House, with eminent members serving here. This House plays a vital role in our democracy: PM @narendramodi https://t.co/0Tbiv8imV6
— PMO India (@PMOIndia) March 28, 2018
We will always remember the distinguished work of Parasaran Ji. Who can forget the manner in which Professor Kurien has contributed to the Rajya Sabha: PM @narendramodi in the Rajya Sabha
— PMO India (@PMOIndia) March 28, 2018
We will always remember the distinguished work of Parasaran Ji. Who can forget the manner in which Professor Kurien has contributed to the Rajya Sabha: PM @narendramodi in the Rajya Sabha
— PMO India (@PMOIndia) March 28, 2018