पीएम्इंडिया
राज्यसभेतून आज सेवानिवृत्त होणारे सदस्य हे अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचे अविभाज्य घटक होते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आज सेवानिवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप देण्यासाठी पंतप्रधानांनी आवर्जुन हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते.
आज सेवानिवृत्त होणाऱ्या सदस्यांचे ज्ञान आणि अनुभव यांचा देशाला फायदा झाला आहे. सदस्यांचा दृष्टीकोन विस्तारण्याच्या दृष्टीने राज्यसभेने महत्त्वाचे योगदान दिले आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. या अनुभवाने त्यांना समृद्ध केले असून, देश आणि समाजाच्या दृष्टीने ही मोलाची बाब आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.
सेवानिवृत्त होणाऱ्या सदस्यांचा अनुभव आणि ज्ञान भविष्यातील देशासाठी लाभदायक ठरेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
आज सेवानिवृत्त होणारे सदस्य हे अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचे अविभाज्य घटक होते. या सदस्यांच्या उपस्थितीत राज्यांना लाभदायक ठरणारे आणखी दोन निर्णय होऊ शकले असते, तर अधिक चांगले झाले असते. वस्तू सेवा कर विधेयक आणि वनीकरण भरपाई निधी विधेयक या दोन विधेयकांबाबतचे हे अपेक्षित निर्णय होत, ज्यामुळे राज्यांना भरपाईसाठी मोठा निधी मिळू शकेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
सेवानिवृत्त होणाऱ्या सदस्यांना शुभेच्छा देत त्यांच्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांनी सरकारतर्फे त्यांचे आभार मानले.
M.Pange / B.Gokhale / M. Desai
PM conveys his best wishes to the members of the Rajya Sabha who are retiring.
— PMO India (@PMOIndia) May 13, 2016
PM @narendramodi notes the contribution of retiring Rajya Sabha MPs to parliamentary proceedings & important decisions that have been taken.
— PMO India (@PMOIndia) May 13, 2016
I wish the GST would have been passed during your tenure in RS. This GST will help states like UP and Bihar: PM to retiring members of RS
— PMO India (@PMOIndia) May 13, 2016