Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राज्यसभेत मंजूर झालेल्या जीएसटी विधेयकासाठी पंतप्रधानांतर्फे सर्व राजकीय पक्षांच्या सदस्यांचे आभार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत नेते आणि सर्व पक्षाच्या सदस्यांचे जीएसटी विधेयकासाठी दिलेल्या पाठिंब्या बद्दल आभार मानलेत. त्यांनी त्यांच्या ट्विटरवरील संदेशात सांगितले की, जीएसटी विधेयकासंबंधित सहकार्य हे सहकारितेचे उत्तम उदाहरण आहे, या सुधारामुळे ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन मिळेल, तसेच अधिकाधिक महसुल मिळवतांना रोजगार व निर्यातीला बढावा मिळेल.

“राज्यसभेमध्ये मंजूर झालेले जीएसटी विधेयक हा ऐतिहासिक क्षण असून, यासाठी मी नेते आणि सर्व राजकीय पक्षांच्या सदस्यांचे आभार मानतो.

21व्या शतकासाठी भारताला उपरोक्त निर्णयामुळे अप्रत्यक्ष कर पद्धती मिळणार आहे.

आम्ही सर्व पक्ष आणि राज्यांबरोबर जीएसटी पद्धतीची ओळख होण्यासाठी निरंतर कार्य करु. यामुळे सर्व भारतीयांना लाभ होणार असून राष्ट्रीय बाजारपेठेला प्रोत्साहन मिळेल”, असे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे.

BG/DR