Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राणी गाइदिन्‍ल्‍यू यांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचा पंतप्रधानांकडून शुभारंभ

राणी गाइदिन्‍ल्‍यू यांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाचा 
पंतप्रधानांकडून शुभारंभ

देशाला लाभलेला स्वातंत्र्य चळवळीचा दैदिप्यमान वारसा आपण जपला पाहिजे व स्वातंत्र्य सैनिकांचे यश व त्यांच्या संघर्षाची परंपरा पुढील पिढीकडे हस्तांतरित होत आहे की नाही याची खातरजमा केली पाहिजे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. राणी गाइदिन्‍ल्‍यू यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त स्मृती नाण्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. आपल्या देशाचे दुर्दैव आहे की राणी गाइदिन्‍ल्‍यूसारख्या लोकांबद्दल आपल्या देशांत फारसे कुणाला माहित नाही किंवा त्यांना जाणूनबुजून विसरले जाते, अशी खंत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.

राणी गाइदिन्‍ल्‍यू यांचा राणी माँ असा उल्लेख करत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या योगदानाला पंतप्रधानांनी यावेळी उजाळा दिला. नागा लोकांच्या हक्कासाठी त्यांनी ब्रिटीश सरकार विरुद्ध सुरु केलेला लढा हा देशाच्या एकात्मता व ऐक्यासाठीचा होता असेही ते यावेळी म्हणाले. महात्मा गांधीचा संदेश ईशान्य भारतात पोहोचविण्याचे श्रेय पंतप्रधानांनी राणी गाइदिन्‍ल्‍यू यांना दिले .

स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष राणी गाइदिन्‍ल्‍यू आपल्या गावात प्रवेश करू शकल्या नाहीत यावर पंतप्रधानांनी खंत व्यक्त केली. भारत देश हा राजा महाराजांनी निर्माण केला नसून तो येथील लोकांनी बनविला आहे असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले

जगाला भेडसावणाऱ्या हवामान बदलाच्या समस्येचे उत्तर ‘निसर्गाशी एकरूप होऊन जगा’ या राणीमांच्या विचारांत मिळू शकते, असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

ईशान्य भारताच्या विकासासाठी केंद्र सरकारने सुरु केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधानांनी माहिती दिली. ईशान्य भारताच्या प्रगतीतून देशाच्या विकासाला चालना मिळेल, असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. बांग्लादेश बरोबर नुकत्याच झालेल्या भूसीमा करारामुळे या भागात रस्ते व दळणवळणाच्या सुविधा विकसित करणे शक्य होणार असल्‍याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. नुकताच झालेल्या नागा शांती कराराविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले, की सलग काही वर्ष विविध सरकारकडून केल्या गेलेल्या प्रयत्नातून हे शक्य झाले आहे.

नागालँडचे राज्यपाल पी बी आचार्य, नागालँडचे मुख्यमंत्री श्री टी आर झेलीयांग, मणिपूरचे मुख्यमंत्री इबोबी सिंग, केंद्रीय मंत्री अरुण जेटली, राजनाथ सिंग, डॉ महेश शर्मा, डॉ जितेंद्र सिंग आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

A.Desai/N.Sapre