Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रामचरित्‌मानसच्या डिजिटल आवृत्तीचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामचरितमानसच्या डिजिटल आवृत्तीचं प्रकाशन केले. आकाशवाणीने या डिजिटल सीडीच्या संचाची निर्मिती केली आहे.

या सांगीतीक निर्मितीत योगदान देणाऱ्या कलाकारांच्या प्रयत्नांना दाद देत या कलाकारांनी केवळ संगीत साधना केली नाही तर त्यांनी संस्कृती साधना आणि संस्कार साधनाही केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

रामचरित्‌मानस म्हणजे भारतीयांच्या जीवनाचे सार असणारे महाकाव्य आहे. मॉरिशस तसेच जगाच्या विविध भागात जाणाऱ्या भारतीयांनी रामचरित्‌मानसद्वारा पिढ्यानपिढ्या भारताशी असलेली नाळ कायम ठेवली असे पंतप्रधान म्हणाले.

जनतेत एकोपा कायम ठेवण्यात आणि देशात माहिती आणि जनजागृती करण्यात आकाशवाणी बजावत असलेल्या भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. देशभरातल्या विविध कलाकारांचे सुमारे नऊ लाख तासांचे ध्वनीमुद्रण आकाशवाणीकडे असल्याची माहिती त्यांना यावेळी देण्यात आली. हा अमोल ठेवा, भावी पिढीसाठी तपशीलवार राखायला हवा असं पंतप्रधान म्हणाले.

माहिती आणि प्रसारणमंत्री अरुण जेटली, प्रसारभारती मंडळाचे अध्यक्ष सूर्यप्रकाश याप्रसंगी उपस्थित होते.

N.Chitale/S.Tupe