पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 26 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याग, तपस्या आणि आत्मसंयम या वैशिष्ट्यांचे प्रतिक असलेले मर्यादा पुरुषोत्तम प्रभू राम यांचे जीवन प्रत्येक परिस्थितीचा सामर्थ्याने आणि निर्धाराने सामना करण्यासाठी लोकांना प्रेरणा देत आले आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
प्रभू राम यांचे आदर्श सदैव प्रासंगिक असणार आहेत ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली आहे. ही मूल्ये केवळ भारतातील लोकांनाच नाही, तर प्रत्येक काळत संपूर्ण मानवजातीसाठीची मार्गदर्शक शक्ती आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश :
“देशभरातील माझ्या सर्व कुटुंबियांना रामनवमीच्या अनंत शुभेच्छा. त्याग, तप आणि संयमाने भारलेल्या मर्यादा पुरुषोत्तमाच्या जीवनातून आपल्याला प्रत्येक परिस्थितीचा पूर्ण सामर्थ्याने सामना करण्याची प्रेरणा मिळते. त्यांचे आदर्श अनंतकाळापर्यंत भारतीयांसह संपूर्ण मानवजातीचे मार्गदर्शक राहतील. प्रभून रामांच्या कृपेने सर्वांचे कल्याण व्हावे, यामुळे विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाच्या सिद्धीचा मार्ग प्रशस्त व्हावा हीच माझी कामना.”
देशभर के मेरे परिवारजनों को रामनवमी की असीम शुभकामनाएं। त्याग, तप और संयम से भरे मर्यादा पुरुषोत्तम के जीवन से हमें हर परिस्थिति का पूरे सामर्थ्य से सामना करने की प्रेरणा मिलती है। उनके आदर्श अनंतकाल तक भारतवासियों के साथ-साथ संपूर्ण मानवता के पथ-प्रदर्शक बने रहेंगे। मेरी कामना… pic.twitter.com/nOQzwTpfRi
— Narendra Modi (@narendramodi) March 26, 2026
* * *
नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com