Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2026 मध्ये, भारोत्तोलनात महिलांच्या 69 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल हरजिंदर कौर यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


नवी दिल्ली,29 जुलै 2026

ग्लासगो येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2026 मध्ये भारोत्तोलनात, महिलांच्या 69 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल, हरजिंदर कौर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

हरजिंदर यांची ही कामगिरी त्यांची स्वतःची आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे हे नमूद करत पंतप्रधानांनी राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या भारोत्तोलकांची अशी उत्कृष्ट कामगिरी पाहून खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे.

मोदी यांनी हरजिंदर कौर यांना भविष्यातील त्यांच्या पुढील प्रवासासाठी आणि प्रयत्नांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर  लिहिले आहे;

“ग्लासगो येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत, भारोत्तोलनात महिलांच्या 69 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल हरजिंदर कौर यांचे खूप खूप अभिनंदन. कालची त्यांची ही कामगिरी  आजवरची त्यांची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. या स्पर्धेत आपले भारोत्तोलक इतकी उत्तम कामगिरी बजावताना पाहून मनापासून आनंद होत आहे. हरजिंदरना, त्यांच्या भविष्यातील पुढील वाटचालीसाठी माझ्या अनेक शुभेच्छा.”

#CWG2026″

शैलेश पाटील/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai