Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये उंच उडी या क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल सर्वेश कुशारे याचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 28 जुलै 2026

 

ग्लासगो इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये उंच उडी या क्रीडा प्रकारात पुरुषांसाठीच्या सामन्यात रौप्य पदक पटकावल्याबद्दल सर्वेश कुशारे याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. सर्वेश कुशारे याचा निग्रह आणि सातत्य या गोष्टींची प्रशंसा करत त्याची ही कामगिरी अद्वितीय असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे

भारताला त्याचा अभिमान आहे असे नमूद करत मोदी यांनी त्याला भावी आयुष्यातील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे;

“#CWG2026 मध्ये उंच उडी या प्रकारात पुरुषांसाठीच्या  सामन्यात रौप्य पदक जिंकून सर्वेश कुशारेने उल्लेखनीय यश मिळवले आहे. त्याचा निग्रह आणि सातत्य नमूद करण्याजोगे  आहे. त्याच्या झळाळत्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन. भारताला त्याचा अभिमान आहे. ‌ पुढील आयुष्यातील अधिकाधिक यशासाठी त्याला शुभेच्छा”

 

* * *

निलिमा चितळे/विजया सहजराव/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai