Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी नीरज चोप्रा यांचे अभिनंदन केले


 

ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या भालाफेक प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रा यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी म्हटले आहे की, नीरज चोप्रा यांनी पुन्हा एकदा उल्लेखनीय सातत्य, संयम आणि जिद्द सिद्ध केली आहे.

नीरज चोप्रा यांच्या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे आणि नीरज चोप्रा यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ (X) वर लिहिले आहे:

“ग्लासगो येथील पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक जिंकले आहे!

त्याने पुन्हा एकदा आपले उल्लेखनीय सातत्य, संयम आणि जिद्द सिद्ध केली आहे. त्याच्या यशाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. #CWG2026

@Neeraj_chopra1” 

***

यश राणे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]