Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या 55 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल जादुमणि सिंग मंडेन्गबाम यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


 

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या 55 किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या जादुमणि सिंग मंडेन्गबाम यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी म्हटले आहे की, जादुमणि सिंग मंडेन्गबाम यांचे यश त्यांच्या धैर्य, शिस्त आणि चिकाटीचे प्रतीक आहे. 

त्यांनी त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

समाजमाध्यम ‘एक्स’ वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले,

 “ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रमंडल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटातील मुष्टियुद्ध स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या जादुमणि सिंग मंडेन्गबाम यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांचे यश हे त्यांच्या धैर्य, शिस्त आणि चिकाटीचे फलित आहे. त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.”

 #CWG2026

***

यश राणे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai