Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रपतींच्या वाढदिवसाच्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते दोन पुस्तकांचे प्रकाशन

राष्ट्रपतींच्या वाढदिवसाच्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते  दोन पुस्तकांचे प्रकाशन

राष्ट्रपतींच्या वाढदिवसाच्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते  दोन पुस्तकांचे प्रकाशन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनातल्या ऐतिहासिक दरबार हॉलमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात “स्पीचेस ऑफ प्रेसिंडेट – खंड तिसरा” आणि “प्रेसिंडेशियल रिट्रीट्‌स” या दोन पुस्तकांचे प्रकाशन केले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांपैकी हा एक कार्यक्रम होता.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. आपल्या राजकीय कारर्कीर्दीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केंद्र सरकारमधील अनेक उच्च पदाचा कार्यभार समर्थपणे पेलल्याचे गौरवोद्‌गार पंतप्रधानांनी यावेळी काढले. राष्ट्रपतींसोबत पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे भाग्य असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

दोन्ही पुस्तके अतिशय उत्तम रितीने लिहिलेली असून या पुस्तकातून राष्ट्रपतींच्या तल्लख बुध्दीचे दर्शन घडते असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

J.Patnakar/S.Tupe/M.Desai