Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रपतींनी दिलेल्या शुभेच्छा आणि गौरवोद्गारांबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली


नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2026

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि काढलेल्या गौरवोद्गारांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांनी नमूद केले की, ही वर्षे सेवेचा एक अत्यंत समाधानकारक प्रवास राहिली आहेत, आणि या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना जनतेचं प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद लाभले आहेत.

देशाने आज जी प्रगती साधली आहे ती, कोट्यवधी भारतीयांनी देशाच्या परिवर्तनात आत्मविश्वास आणि दृढनिश्चयाने सामील होण्याचा निर्णय घेतल्यामुळेच शक्य झाली असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. जनतेच्या दैनंदिन जीवनात या बदलाचे  प्रतिबिंब पाहावयास मिळणे ही विशेष समाधानकारक बाब असल्याचे ते पुढे म्हणाले.

देशातील प्रत्येक जण ‘विकसित भारताच्या’ वाटेवर चालत असताना आपण देखील त्याच कर्तव्य आणि समर्पण भावनेने यापुढे देखील देशसेवा करत राहू  असे पंतप्रधान ठामपणे म्हणाले.

‘एक्स’ या समाजमाध्यमांवरील संदेशांत पंतप्रधान म्हणतात :

“राष्ट्रपती महोदया, तुम्ही दिलेल्या शुभेच्छा आणि केलेल्या प्रशंसेबद्दल आभार.

आजवरचा हा प्रवास खरोखरच अतिशय समाधानकारक राहिला आहे. या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रेम, विश्वास आणि लोकांचे आशीर्वाद लाभले.

कोट्यवधी भारतीयांनी देशाच्या परिवर्तनात आत्मविश्वास आणि दृढनिश्चयाने सामील होण्याचा निर्णय घेतल्यामुळेच देशाने आज केलेली प्रगती साध्य झाली आहे. जनतेच्या दैनंदिन जीवनात या बदलाचे  प्रतिबिंब पाहावयास मिळणे ही विशेष समाधानकारक बाब आहे.

देशातील प्रत्येक जण ‘विकसित भारताच्या’ वाटेवर चालत असताना मी  देखील त्याच कर्तव्य आणि समर्पण भावनेने यापुढे देखील देशसेवा करत राहीन @rashtrapatibhvn”

सुषमा काणे/सविता म्हसकर/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai