पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 20 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
धैर्य, साधेपणा, नम्रता आणि लोकसेवेप्रती असलेली त्यांची अविचल बांधिलकी यांमुळे त्यांचा जीवनप्रवास देशभरातील नागरिकांना प्रेरणा देत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
मोदी यांनी नमूद केले की, सार्वजनिक जीवनातील अनेक वर्षांच्या कारकिर्दीत राष्ट्रपतींनी देशाची उल्लेखनीय सेवा केली असून, विशेषतः वंचित आणि उपेक्षित घटकांच्या कल्याणाबाबत त्यांना विशेष आस्था आहे.
भारताच्या विकासासाठी त्यांची दृढ निष्ठा अत्यंत प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
राष्ट्रसेवेसाठी त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभावे, अशी प्रार्थना मोदी यांनी केली असून, आज ओडिशामधील एका कार्यक्रमात त्यांची भेट घेण्यास आपण उत्सुक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’वरील संदेशात म्हटले आहे :
“भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धैर्य, साधेपणा, नम्रता आणि लोकसेवेप्रती अविचल बांधिलकी यांमुळे त्यांचा जीवनप्रवास देशभरातील लोकांना प्रेरणा देत आहे.
सार्वजनिक जीवनातील अनेक वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी देशाची उल्लेखनीय सेवा केली आहे. विशेषतः वंचित आणि उपेक्षित घटकांच्या कल्याणाविषयी त्यांना विशेष आस्था आहे. भारताच्या विकासासाठी त्यांची दृढ निष्ठा अत्यंत प्रेरणादायी आहे.
राष्ट्रसेवेसाठी त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, हीच प्रार्थना. आज ओडिशामधील कार्यक्रमात त्यांची भेट घेण्यास मी उत्सुक आहे.
@rashtrapatibhvn”
Warm birthday greetings to the President of India, Smt. Droupadi Murmu Ji. Her journey, marked by courage, simplicity, humility and unwavering commitment to public service, continues to inspire people across the country.
Through her many years in public life, she has served the…
— Narendra Modi (@narendramodi) June 20, 2026
* * *
आशिष सांगळे/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Warm birthday greetings to the President of India, Smt. Droupadi Murmu Ji. Her journey, marked by courage, simplicity, humility and unwavering commitment to public service, continues to inspire people across the country.
— Narendra Modi (@narendramodi) June 20, 2026
Through her many years in public life, she has served the…