Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रपती भवन संग्रहालय फेज-2चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

राष्ट्रपती भवन संग्रहालय फेज-2चे पंतप्रधानांच्या  हस्ते उद्‌घाटन

राष्ट्रपती भवन संग्रहालय फेज-2चे पंतप्रधानांच्या  हस्ते उद्‌घाटन


राष्ट्रपती भवन संग्रहालय फेज-2 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी काही ग्रंथांचे प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. आज प्रकाशित करण्यात आलेले ग्रंथ ऐतिहासिक काळावर भविष्यात अविट ठसा उमटवणारे ठरणार आहेत असे मनोगत व्यक्त करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले, या संग्रहामुळे मागचा संपूर्ण काळ जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने केलेला हा एक उत्तम प्रयत्न आहे.

राष्ट्रपती मुखर्जी यांनी केलेल्या देशसेवेबद्दल तसेच राष्ट्रपती म्हणून बजावलेल्या भूमिकेबद्दल मोदी यांनी गौरवोद्‌गार काढले. वेगवेगळया राजकीय पार्श्वभूमीतून आलेल्या नेत्यांना बरोबर घेऊन कार्य कसे करता येऊ शकते, याचा आदर्श वस्तुपाठ राष्ट्रपती मुखर्जी यांनी घालून दिला असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

राष्ट्रपती भवनामध्ये नवीनकृत ऊर्जा, जलसंवर्धन आणि डिजिटल इंडिया यासारख्या नवकल्पनांचा अतिशय प्रभावी वापर केल्‍याचाही उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला.

B.Gokhale/ S.Bedekar