Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांचे दलाच्या शूर कर्मचाऱ्यांना अभिवादन


नवी दिल्ली, 19 जानेवारी 2026

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा आज  स्थापना दिन असून त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दलाच्या शूर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त करताना त्यांचे धाडस, समर्पण आणि निस्वार्थ सेवेची प्रशंसा करत त्यांना अभिवादन केले आहे.

एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात ते म्हणतात:

“आपत्तीच्या वेळी ज्यांची व्यावसायिकता आणि दृढनिश्चय प्रकर्षाने दिसून येतो अशा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पुरुष आणि स्त्री कर्मचाऱ्यांचे या दलाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून  आम्ही मनःपूर्वक कौतुक करतो. आपत्तीच्या प्रसंगी नेहमीच आघाडीवर राहून, एनडीआरएफचे कर्मचारी जीवितांचे रक्षण करण्यासाठी, मदत पुरवण्यासाठी आणि सर्वात आव्हानात्मक परिस्थितीत पुन्हा आशा निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम करतात. त्यांचे कौशल्य आणि कर्तव्याची भावना सेवेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. गेल्या काही वर्षांत, एनडीआरएफ आपत्तीचा सामना करण्याची तयारी आणि प्रतिसाद याबाबतीत एक मापदंड बनले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने आदराचे स्थान प्राप्त केले आहे.”

नेहा कुलकर्णी /मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com