Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय खनिक आरोग्य संस्थेचे आयसीएमआर-राष्ट्रीय व्यावसायिक आरोग्य संस्थेबरोबर विलीनीकरण करायला मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने खाण मंत्रालय अंतर्गत स्वायत्त संस्था राष्ट्रीय खनिक आरोग्य संस्था (एनआईएमएच) बरखास्त करायला आणि सर्व संपत्ति आणि देणी यांसह आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत आईसीएमआर- राष्ट्रीय व्यावसायिक स्वास्थ्य संस्था (एनआईओएच), अहमदाबादमध्ये विलीनीकरण करायला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाने एनआईएमएचच्या सर्व कर्मचाऱ्यांना समान पद/ वेतनासह एनआईओएचमध्ये सामावून घ्यायला आणि त्याच्या वेतन सुरक्षेची मंजूरी दिली आहे.

प्रभाव:

एनआईएमएचचे एनआईओएचमध्ये विलीनीकरण झाल्यामुळे दोन्ही संस्थाना सरकारी तिजोरीच्या सक्षम प्रबंधन व्यवस्थेव्यतिरिक्त व्यावसायिक क्षेत्रात विशेषज्ञता वाढवण्यात लाभ मिळेल.

**********

S.Tupe/S.Kane/P.Malandkar