Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय गृहनिर्माण धोरण विकास आणि व्यवस्थापन क्षेत्रासंदर्भात भारत आणि केनिया यांच्यात सामंजस्य करार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि केनिया यांच्यात राष्ट्रीय गृहनिर्माण धोरण विकास आणि व्यवस्थापन क्षेत्रात परस्पर सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांच्या नैरोबी दौऱ्यादरम्यान 11 जुलै 2016 रोजी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराबाबत माहिती दिली.

या करारान्वये गृहनिर्माण आणि संबंधित बाबींसंदर्भात तसेच प्रदर्शने, परिषदा आणि कार्यशाळांबाबत दोन्ही पक्ष सहकार्य करतील. दोन्ही देशांमधील झोपडपट्टयांची सुधारणा आणि अनुभव तसेच अंमलबजावणीवर आधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना करणाऱ्यावर दोन्ही देश प्रामुख्याने भर देतील.

गृहनिर्माण आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील गुंतवणूक संधी तसेच बाजाराची सद्यस्थिती याबाबतच्या माहितीची दोन्ही देशांमध्ये देवाण-घेवाण होईल. उपलब्ध स्थानिक इमारत बांधणी साहित्याच्या आधारे परवडण्याजोगी घरे बांधण्याच्या दृष्टीने तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा ठरणार आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha