Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी जमशेदपुर येथून देशभरातील पंचायतींना संबोधित केले

राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधानांनी जमशेदपुर येथून देशभरातील पंचायतींना संबोधित केले


राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जमशेदपुर येथून देशभरातील सर्व पंचायतींना संबोधित केले.

महू येथे 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीदिनी सुरु झालेल्या “ग्रामोदय से भारत उदय” अभियानाचा समारोप या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाला. ग्रामीण भागातील सेवा आणि सुविधा शहरांसारख्या असायला हव्यात यावर नरेंद्र मोदी यांनी भर दिला.

पंतप्रधानांनी पंचायत प्रतिनिधींना त्यांचा कार्यकाळ गावांमध्ये परिवर्तनात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने जनतेची सेवा करण्यासाठी उपयोगात आणण्याचे आवाहन केले.

विशेष उल्लेख करत ते म्हणाले की, शौचालय बांधणीसारख्या क्षेत्रांमध्ये महिला नेतृत्वाची भूमिका पार पाडू शकतात.

त्यांनी पंचायतींना मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची विनंती केली. ते म्हणाले की, जर मुलांनी शाळेत जाणे बंद केले तर त्याबद्दल पंचायत सदस्यांना काळजी वाटायला हवी.

पंतप्रधानांनी पंचायतींना अर्थसंकल्पीय तरतुदींच्या पलीकडे विचार करण्यासाठी प्रोत्साहित करतानाच जनसुविधांवर लक्ष केंद्रित करायला सांगितले.

कार्यक्रमानंतर, पंतप्रधान व्यासपीठावरुन खाली उतरले आणि जमशेदपुरमध्ये आलेल्या देशभरातील काही पंचायत प्रतिनिधींची भेट घेतली. 2013 मध्ये त्यांच्या सभेदरम्यान पाटणा येथे झालेल्या बॉम्बस्फोटातील पीडितांपैकी एकाच्या पत्नी आणि मुलीचीही पंतप्रधानांनी भेट घेतली.

S.Kane / B. Gokhale