Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त पंतप्रधानांच्या पत्रकारांना शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी म्हटले आहे, “ राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त माध्यमांमधील सर्व मित्रांना माझ्या शुभेच्छा. आपल्या माध्यमांचे विशेषत: वार्ताहर आणि छायाचित्रकारांच्या मेहनतीची मी प्रशंसा करतो, जे अथक परिश्रम घेऊन प्रत्यक्ष भेट देऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या विविध बातम्या घेऊन येतात.

आवाज नसलेल्यांचा आवाज पोहोचवण्यात माध्यमांची भूमिका प्रशंसनीय आहे. गेल्या तीन वर्षात माध्यमांनी “स्वच्छ भारत अभियानाला” अधिक बळ दिले आणि स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला.

सध्याच्या काळात, समाज माध्यमांचा उदय आपण पाहत आहोत आणि मोबाईल फोनद्वारे बातम्या वाचल्या आणि ऐकल्या जात आहेत. मला खात्री वाटते की, या क्रांतीमुळे माध्यमांची व्याप्ती वाढेल आणि माध्यमे अधिक लोकशाही आणि समावेशक बनतील.

मुक्त पत्रकारिता हा लोकशाहीचा कणा आहे. पत्रकारिता आणि सर्व प्रकारच्या अभिव्यक्तींचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. सवाशे कोटी भारतीयांचे कौशल्य, सामर्थ्य आणि सर्जनशीलता यांचे दर्शन घडवण्यासाठी आपल्या माध्यमांचा अधिकाधिक वापर होवो.”

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar