पीएम्इंडिया
राष्ट्रीय महामार्गांवर सुरक्षित आणि विनाव्यत्यय प्रवास सुनिश्चित करण्यांसाठी 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या ‘सेतु भारतम्’ या महत्वाकांक्षी पूल बांधणी कार्यक्रमाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुभारंभ केला.
2019 सालापर्यंत सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वे लेव्हल क्रॉसिंगमुक्त करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत 208 नवीन उन्नत पूल किंवा भुयारी पूल बांधण्यांत येतील तर 1500 पुलांचे रुंदीकरण, पुनर्निर्माण केले जाईल. किंवा नवीन पूल बांधले जातील.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, केंद्र सरकारला या दिशेने खूप मोठे परिवर्तन घडवून आणायचे आहे. देशाच्या विकासासाठी चांगल्या पायाभूत सुविधांचे महत्व अधोरेखित करुन ते म्हणाले की, ज्याप्रमाणे मनुष्याच्या शरीरात धमन्या आणि नस महत्वाची आहे त्याचप्रमाणे देशासाठी रस्ते महत्वाचे आहेत.
पंतप्रधानांनी रेल्वे, सिंचन आणि डिजिटल जोडणी यांसारख्या अन्य पायाभूत विकास क्षेत्रांमधील सरकारच्या उपक्रमांबाबतही यावेळी माहिती दिली.
दे./काणे/सु.