Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय रुर्बन अभियानाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

राष्ट्रीय रुर्बन अभियानाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमधल्या राजनंदगाव जिल्हयातल्या कुरुभात येथे राष्ट्रीय रुर्बन अभियानाचा प्रारंभ केला. ग्रामीण आत्मा आणि शहरी सोयी-सुविधांनी युक्त अशा समूहविकासावर आधारित विकास करण्यासाठी रुर्बन अभियान सक्षम ठरेल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. स्मार्ट खेडी निर्माण करुन स्मार्ट सिटी उपक्रमासाठी हे रुर्बन अभियान पूरक ठरेल असे पंतप्रधान म्हणाले. रुर्बन समूह विकास, आर्थिक घडामोडींचे केंद्र ठरेल आणि त्यामुळे आजुबाजुच्या खेडयातल्या जनतेचे जीवनमान उंचावून विकासाला चालना मिळेल असेही त्यांनी सांगितले.

देश, विकासाच्या एका नव्या दिशेने वाटचाल करत आहे. याचे उदाहरण म्हणजे रुर्बन अभियानाचा प्रारंभ नवी दिल्लीतून नव्हे, तर छत्तीसगडमधल्या राजनंदगाव जिल्हयातल्या कुरुभात येथून झाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. खेडी आणि आदिवासी समाजाच्या दरवाज्यात प्रशासन आणले जात आहे असे ते म्हणाले.

आजूबाजूची खेडी हागणदारीमुक्त झाल्याबद्दल ती खेडी आणि समुदायांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. तत्पूर्वी विकास योजनांची अंमलबजावणी आणि हस्तकलाकृतींच्या प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली.

N.Chitale/S.Tupe/M.Desai