Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पंतप्रधानांनी वैज्ञानिक आणि विज्ञान प्रेमींना दिल्या शुभेच्छा; सर सी. व्ही. रमन यांच्या विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचे स्मरण केले


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिक आणि विज्ञान प्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सर सी. व्ही. रमन यांच्या विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल, त्यांचे स्मरण केले.

“राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिक आणि विज्ञान प्रेमींना शुभेच्छा. आपल्या देशात संशोधन आणि नवीन शोधांची भावना जागृत राहो” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
“आम्ही खूप अभिमानाने “विज्ञान क्षेत्रात सर सी. व्ही. रमन यांच्या समृद्ध आणि चीरस्थायी योगदानाचे स्मरण करतो. ते तरुणांसाठी मोठे प्रेरणा स्त्रोत आहेत” असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

(Release ID :136965)
J. Patankar / S.Tupe / M. Desai