पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा कार्यकाळ 31.3.2019 च्या पुढे तीन वर्षांसाठी वाढवायच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
वैशिष्ट्ये
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची (एनसीएसके) स्थापना वर्ष 1993 मध्ये एनसीएसके कायदा 1993 च्या तरतुदीनुसार सुरुवातीला 31.03.1997 पर्यंत करण्यात आली होती. त्यांनतर या कायद्याची वैधता 31.03.2002 पर्यंत आणि नंतर 29.02.2004 पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यांनंतर एनसीएसकेचा कार्यकाळ बिगर-संविधानिक संस्था म्हणून वेळोवेळी वाढवण्यात आला. सध्याच्या आयोगाचा कार्यकाळ 31.03.2019 पर्यंत आहे.
मुख्य प्रभाव :
या प्रस्तावाचा लाभ सफाई कर्मचारी आणि हाताने साफसफाई काम करणार्यांना होईल. 31.01.2019 अनुसार एमएस अधिनियम सर्वेक्षण अंतर्गत पाहणी करण्यात आलेल्या हाताने साफसफाई करणाऱ्या व्यक्तींची संख्या 14226 आहे. तर नीति आयोगाच्या आदेशाने सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने केलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार ही संख्या 31128 आहे.
N.Sapre/S.Kane/P.Kor