Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त पंतप्रधानांकडून भारताच्या सागरी वारशाचे स्मरण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सागरी दिनाच्या निमित्ताने भारताच्या समृद्ध सागरी वारशाची आठवण करून दिली तसेच या क्षेत्राशी संबंधित सर्वांच्या अमूल्य योगदानाची दखल घेतली.
पंतप्रधानांनी नमूद केले की सागरी क्षेत्रात कार्यरत व्यक्तींची समर्पित भावना देशाची अर्थव्यवस्था, व्यापार आणि संपर्कव्यवस्था अधिक मजबूत करते.
राष्ट्राच्या समृद्ध भविष्यासाठी सागरी क्षेत्रातील अपार क्षमतेचा प्रभावी वापर करण्याप्रति  सरकारची वचनबद्धता  त्यांनी पुन्हा अधोरेखित केली.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वर लिहिले:
“राष्ट्रीय सागरी दिनानिमित्त आपण भारताच्या सागरी वारशाची आणि या क्षेत्राशी संबंधित सर्वांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण  करतो. त्यांच्या समर्पणामुळे आपली अर्थव्यवस्था, व्यापार आणि संपर्क अधिक बळकट होतो.
आपल्या सागरी क्षेत्रातील अपार क्षमतेचा उपयोग करून समृद्ध भविष्य घडविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.”

***

सुषमा काणे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai